news
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड मनपा ‘ॲक्शन मोड’वर; ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भव्य कार्यशाळा!निवडणुकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या? ८० लाख महिलांना अपात्र केल्याने कष्टकरी संघर्ष महासंघाचे तहसील कचेरीवर ‘रुसवा आंदोलन’!पिंपळे सौदागरच्या काटे पेट्रोल पंप चौकात प्रवाशांचे अतोनात हाल; वाटसरू धुळीतभोसरीत ‘ये रे माझ्या मागल्या’! पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; ‘नो पार्किंग’ झोनमध्ये रिक्षाचालकांचा धुमाकूळ, वाहतूक पोलीस गेले कुठे?पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन!
Home पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले; अवघ्या ५ महिन्यांत २७ टोळ्यांमधील १५० गुन्हेगारांवर ‘मोका’चा बडगा!

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले; अवघ्या ५ महिन्यांत २७ टोळ्यांमधील १५० गुन्हेगारांवर ‘मोका’चा बडगा!

मे महिन्यातच देहूरोड, काळेवाडी, चिखली आणि म्हाळुंगे परिसरातील ५ टोळ्यांमधील ४५ सराईत गुन्हेगारांना पोलिसांचा दणका; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची कडक मोहीम

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ६ जून २०२६ पिंपरी:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर आणि औद्योगिक परिसरातून संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या थेट आदेशानुसार, शहरात दहशत निर्माण करणाऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत सन २०२६ या चालू वर्षाच्या अवघ्या पाच महिन्यांतच तब्बल २७ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण १५० आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA – मोका) अंतर्गत अत्यंत कडक कारवाई करण्यात आली आहे.

एकट्या मे २०२६ या महिन्यामध्ये पोलिसांनी धडक कारवाई करत आयुक्तालय हद्दीतील ५ वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण ४५ सराईत गुन्हेगारांवर ‘मोका’ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, तर काळेवाडी, उत्तर म्हाळुंगे आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका टोळीचा समावेश आहे

देहूरोड पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी आणि दहशत निर्माण करणाऱ्या आफताब समीर शेख (वय २४, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) या टोळी प्रमुखासह त्याच्या ७ साथीदारांवर मोका लावण्यात आला आहे या टोळीवर परिसरात एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • टोळी सदस्य: रेहान रियाज तांबोळी/शेख (वय १९), सिद्दीक सलाम शेख (वय २५), मोहम्मदअली शकील शेख (वय १९), अरमान हुसेन शेख (वय २२), मोहम्मद सिद्दीक अताउर रेहमान शेख (वय २९), आणि नौशाद नजीर शेख (वय २५).

देहूरोड परिसरातील खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या साबीर समीर शेख (वय २३, रा. गांधीनगर, देहूरोड) या टोळी प्रमुख आणि त्याच्या तब्बल २० साथीदारांवर ‘मोका’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे या टोळीच्या नावावर तब्बल १९ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे

  • प्रमुख सदस्य: निखिल उर्फ लखन बाळू आगळे (वय २७), अरमान हुसेन शेख (वय २१), नौशाद नजीर शेख (वय २६), मोहम्मद सिद्दीकी अत्ताऊर रेहमान शेख (वय ३०), अन्वर उमर शेख (वय २६), संदीप बाबू तेलगू (वय २०), अहमद उर्फ टिल्या शमशेर खान मोकाशी (वय २५), रितेश पुनाजी जाधव (वय २४) आणि इतरांचा यात समावेश आहे

काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी आणि दहशत माजवणारा टोळी प्रमुख विकी शंभुलिंग सुतार (वय ३२, रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी) आणि त्याच्या ३ टोळी सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहेया टोळीवर ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

  • टोळी सदस्य: अभिषेक नरसिंग मांडगुळे (वय २६), बाबुराव सोमलिंग पाटील (वय २९) आणि महेश जयसिंग गिरासे (वय २८)

औद्योगिक वसाहती असणाऱ्या म्हाळुंगे आणि चाकण परिसरात खंडणी आणि मारामारी करणाऱ्या सागर बाळू जावळे (वय ३४, रा. कुरकुंडी, खेड) आणि त्याच्या टोळीतील एकूण ७ जणांवर (ज्यामध्ये एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश आहे) मोका लावण्यात आला आहे या टोळीवर ७ गंभीर गुन्हे नोंद आहेत

  • टोळी सदस्य: नितीन संजय थिटे (वय २७), सौरभ उर्फ सोन्या अनिल ढोरे (वय २८), कुणाल प्रशांत चव्हाण (वय २३), अजय भरत गोपाळे (वय २३), ओमकार दशरथ कोरडे (वय २४) आणि ओमकार काळूराम चव्हाण (वय १७).

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या अंबादास उर्फ सोन्या राजू राठोड (वय २४, रा. रामदासनगर, चिखली – सध्या फरार आरोपी) या टोळी प्रमुख आणि त्याच्या ५ साथीदारांवर मोका लावण्यात आला आहे.

  • टोळी सदस्य: अफजल हबूबुल्ला शहा (वय २२), मोहम्मद सिद्दीकी उर्फ मोहम्मद लालु चौधरी (वय २६), ओमकार गौतम (फरार), विशाल उर्फ बंटी बुद्राम गौतम (वय १९) आणि अरुण उर्फ शिवा रामसुरत गौतम (वय १६) ही धडक कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) श्री. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर (परिमंडळ-४), श्री. मारुती जगताप (परिमंडळ-३), विशाल गायकवाड (परिमंडळ-२) आणि श्री. रोहिदास पवार व डॉ. शिवाजी पवार (पोलीस उप-आयुक्त, गुन्हे) यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे (देहूरोड), राजेंद्र बहिरट (काळेवाडी), दिगंबर सूर्यवंशी (उत्तर म्हाळुंगे), विठ्ठल साळुंखे (चिखली) आणि पी.सी.बी. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.

“शहरात कोणतीही भाईगिरी किंवा संघटित टोळी खपवून घेतली जाणार नाही; गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहीम अशीच कडकपणे सुरू राहील,” असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!