news
शासनमान्य ग्रंथालयांना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून अर्थसहाय्याची संधी; २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘अजातशत्रू – अजितदादा’ पुस्तक मुखपृष्ठ अनावरण सोहळा संपन्नपिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत होर्डिंग्सविरोधात ॲक्शन मोड; आकाशचिन्ह व परवाना विभागाचा थेट हातोडामोशी हत्याकांडावरून पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय एल्गार; पोलीस आयुक्तांना दिले तीव्र निदर्शनांचे निवेदनसांगवीत भाजप युवा सेना नेते जवाहरशेठ ढोरे यांचा नागरी सत्कार उत्साहात; सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताचा संकल्प
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन!

पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन!

महापौर रवि लांडगे आणि आमदार अमित गोरखे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वाहिली आदरांजली; ६ जून २०२६

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ६ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि विकासात अत्यंत मोलाचे योगदान देणारे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शहरवासीयांच्या वतीने त्यांना अत्यंत भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. पिंपरी वाघेरे येथील त्यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याजवळ या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी पिंपरी-चिंचवडचे कार्यक्षम महापौर रवि लांडगे यांनी दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालिकेच्या वतीने आणि वैयक्तिक पातळीवर आदरयुक्त श्रद्धांजली वाहिली. भिकू वाघेरे पाटील यांनी आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात राबवलेले लोककल्याणकारी प्रकल्प आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेले त्यांचे घट्ट नाते आजही शहरवासीयांच्या स्मरणात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या जाहीर अभिवादन सोहळ्याला पिंपरी-चिंचवडमधील विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमास विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर संजोग वाघेरे, महापालिका स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, तसेच विद्यमान नगरसदस्य उपस्थित होते.

यासोबतच वाघेरे परिवारातील सदस्य आणि माजी नगरसदस्य प्रभाकर वाघेरे, दत्तात्रय वाघेरे, उषा वाघेरे यांनी देखील दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला. महापालिका प्रशासनाच्या वतीने उप आयुक्त अण्णा बोदडे आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली. अभिवादन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. “भिकू वाघेरे पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहराला एक नवी दिशा दिली. त्यांचा सर्वसमावेशक विकास कामांचा वारसा आणि गरिबांविषयीची कणव आजही नव्या पिढीतील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी पिंपरी वाघेरे परिसरातील स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाघेरे कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या जननेत्याला आदरांजली वाहिली. महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!