पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसची रेंज साधारणपणे २५० किलोमीटर असते.
आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे, कालच पाहिली, एका इलेक्ट्रिक बसने तब्बल १ लाख २४ हजार किलोमीटरचे प्रचंड रनिंग पूर्ण केले आहे!
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये धावणाऱ्या या इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रदूषण तर कमी झालेच, पण प्रवाशांना आता एसीमधून प्रवास करणे शक्य झाले आहे, तेही अगदी कमी दरात.
काही वर्षांपूर्वी पुण्यात असलेल्या जुन्या बसेसच्या तुलनेत या मोठ्या आणि एसी असलेल्या इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांसाठी खूपच सोयीच्या ठरल्या आहेत. आजही १०-१५-२० रुपयांत पुणे ते पिंपरी-चिंचवडचा एसी बसने प्रवास करणे शक्य आहे.
या बसेसची रेंज साधारणतः २५० किलोमीटर असली तरी, त्या तासाभरात फास्ट चार्जरवर पूर्ण चार्ज होतात. शहरांमधील ट्रॅफिक, स्पीडब्रेकर आणि वारंवारचे थांबे असूनही, या बसेस एका चार्जिंगमध्ये ४-५ फेऱ्या आरामात पूर्ण करतात आणि एका दिवसात अशा १०-१२ फेऱ्या सहज होऊ शकतात.
म्हणूनच, या बसेस अक्षरशः ‘पिळून’ काढल्या जातात आणि त्यामुळेच त्या लवकर नादुरुस्त होण्याची किंवा कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता जास्त असते. मात्र, तिकीटाचे दर आणि एसीची सोय पाहता, पुणेकरांना पुन्हा जुन्या सीएनजी बसेसकडे जाणे नक्कीच सोयीचे वाटणार नाही.