पुणे (मॅक्स मंथन डेली न्यूज): तेली सेनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर परिचय ‘लग्नगाठ’ विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आणि तेली समाज जनसंवाद कार्यक्रम लवकरच पुण्यात संपन्न होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत जाधव यांनी समाज बांधवांना केले आहे.
तेली समाजातील विवाह इच्छुक तरुण-तरुणींसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींना सोबत आणावे, जेणेकरून उपस्थितांना त्यांचा परिचय करून देता येईल आणि त्यांच्या विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करता येतील, असे आयोजकांनी सांगितले आहे. तेली समाजाच्या सामाजिक कार्याला गती मिळावी आणि समाजात एकोपा वाढावा, या उद्देशाने तेली सेना प्रयत्नशील आहे.
राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर परिचय ‘लग्नगाठ’ विशेषांकाचा प्रकाशन सोहळा आणि तेली जनसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन संताजी जगनाडे महाराज सुदुंबरे संस्थेचे अध्यक्ष श्री शिवदास उबाळे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र तेली समाजाचे नेते तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री विजयभाऊ चौधरी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले, गजानन नाना शेलार, माजी महापौर आबा बागुल, युवा नेते सचिन काळे, सुधाकर लोखंडे, रमेश भोज, संजय राऊत, सुभाष पन्हाळे, सिद्धांत हिंगे, विजय रत्नपारखी, गंगाधर हाडके, राजेश येवले, श्याम भगत, काका देशमाने, हरीष देशमाने, राजेश शेजवळ, जीवन येवले, विजय शिंदे, संतोष माकुडे, शिवराज शेलार, प्रकाश कर्डिले, संदिप चिलेकर, रमेश भोज, धनंजय वाठारकर, डॉ. गणेश अंबिके, मनोज अनेकर, प्रदीपसेठ सायकर, पी. टी. चौधरी, अनिता गायकवाड, संगिता चौधरी, वसुंधरा उबाळे, वृषाली केदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज सेवक युवा नेते जीवन येवले, चंद्रकांत जाधव, वृषाली केदार, रंजना बागूल, गायत्री चौधरी, अर्चना फिरके, सुनिता पवार, श्रीराम कोरडे, गणेश वाडेकर, सौ. विद्या चंद्रकांत जाधव, कु. अंजली चंद्रकांत जाधव आणि संतोष काळे परिश्रम घेत आहेत, अशी माहिती तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार गणेश पवार यांनी दिली आहे.
कार्यक्रमाची माहिती:
- दिनांक: २५ मे, रविवार
- स्थळ: साईबाबा मंदिर, मातोश्री अनुसया सांस्कृतिक भवन, चंदननगर, पुणे.
- वेळ: सायंकाळी ४ वाजता (कार्यक्रम वेळेवर सुरू होईल)
अधिक माहितीसाठी चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव (व्यवस्थापक, संताजी जगनाडे महाराज सुदुंबरे संस्था) यांच्याशी ७०२०२६०७१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.