news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पिंपरी चिंचवड आपत्कालीन परिस्थितीत पिंपरी-चिंचवड सज्ज! आयुक्तांचे यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश!

आपत्कालीन परिस्थितीत पिंपरी-चिंचवड सज्ज! आयुक्तांचे यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश!

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; जलद प्रतिसाद पथके चोवीस तास कार्यरत!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): यंदाच्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सज्ज झाली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व विभागांना यंत्रणा तयार ठेवण्याचे आणि सूक्ष्म नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

आज महापालिकेत झालेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत आयुक्त शेखर सिंह बोलत होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त सिंह यांनी निर्देश दिले की, शहरात ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते, अशा ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजना करा. रुग्णालयांमध्ये वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्या. धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन तेथील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचे नियोजन करा. तसेच, पूरस्थितीत बाधित नागरिकांसाठी शाळांची व्यवस्था करावी. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची योजना तयार ठेवावी.

शहरातील नागरिकांना आपत्कालीन स्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी जलद प्रतिसाद पथके (Quick Response Team) चोवीस तास कार्यरत ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या पथकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, स्थापत्य आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

यासोबतच, आकाशचिन्ह विभागाने शहरातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज दोन दिवसांच्या आत काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि आपत्कालीन परिस्थितीत सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, असेही आयुक्तांनी सांगितले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात आपत्कालीन यंत्रणा सक्षम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीत मागील मान्सूनमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीची माहिती सादर केली.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!