news
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो कामगार, महिला व युवकांचा भव्य सहभाग‘यशस्वी’ संस्थेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ‘यशोगाथा’ विशेषांकाचे भव्य प्रकाशनपिंपरी-चिंचवड महापालिका ‘ह’ प्रभाग अध्यक्षा नगरसेविका तृप्तीताई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व १०० राष्ट्रध्वजांचे वितरणरहाटणीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला; महापालिका ‘ड’ प्रभाग सभापती सविताताई खुळे यांच्या हस्ते ध्वजवंदनपिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Home पिंपरी चिंचवड मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडले

मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडले

अधिकारी एसी गाड्या आणि काळ्या काचांमधून फिरत असल्याने गरिबांचे प्रश्न दिसेना; २४ तासांत दुरुस्ती न झाल्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा तीव्र आंदोलनाचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिव्याखाली अंधार! पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ड्रेनेजचे चेंबर ठरतेय ‘डेथ ट्रॅप’; व्हीआयपींच्या काळ्या काचांमुळे डोळे झाक!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला ‘स्मार्ट आणि सुरक्षित’ बनवण्याच्या मोठमोठ्या बाता मारणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ व बेजबाबदार कारभार आता थेट त्यांच्या स्वतःच्या घराच्या उंबरठ्यावर उघडा पडला आहे. महानगरपालिका मुख्य मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या १० मीटर अंतरावर असलेल्या ड्रेनेजचे (चेंबर) झाकण अत्यंत धोकादायक अवस्थेत तुटलेले आहे. या अत्यंत गंभीर समस्येकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अर्बन सेलचे शहराध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत, “प्रशासन कोणाच्या मरणाची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल विचारला आहे. या संदर्भात प्रदीप गायकवाड यांनी मनपा आयुक्त आणि संबंधित मुख्य अभियंत्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन तात्काळ चेंबरचे काम पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

 

या गंभीर नागरी समस्येवर बोट ठेवताना प्रदीप गायकवाड यांनी मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडाडून प्रहार केला आहे. ते म्हणाले:

“हे चेंबर ज्या ठिकाणी तुटलेले आहे, तिथून दररोज महापालिकेचे आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, मुख्य खातेप्रमुख, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि शेकडो आजी-माजी लोकप्रतिनिधी स्वतःच्या वाहनांतून मुख्यालयात ये-जा करत असतात. मात्र, एकालाही या उघड्या राहिलेल्या मृत्यूच्या सापळ्याची दुरवस्था दिसली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या सर्व अधिकाऱ्यांना आणि व्हीआयपी लोकांना ही किरकोळ पण अत्यंत जीवघेणी समस्या का दिसत नाही? कारण हे लोक सर्वसामान्यांचे प्रश्न विसरून, त्यांच्या अथांग किमतीच्या चारचाकी गाड्यांच्या काळ्या काचा चढवून आणि एसी लावून फिरत असतात. काळ्या काचांमधून त्यांना रस्त्यावरच्या या भीषण खड्ड्यांचे आणि गरिबांच्या जीवाला असलेल्या धोक्याचे वास्तव कधी दिसणारच नाही!”

हा ड्रेनेजचा खड्डा ज्या ठिकाणी आहे, तो केवळ अंतर्गत रस्ता नसून अत्यंत महत्त्वाचा आणि प्रचंड वर्दळीचा ‘मुंबई-पुणे महामार्ग’ आहे. येथे दिवस-रात्र २४ तास अतिशय वेगाने वाहने धावत असतात.

अशा अतिवेगवान रस्त्यावर ड्रेनेजचे चेंबर तुटलेले असणे आणि ते उघडे असणे म्हणजे थेट वाहनचालकांच्या, विशेषतः दुचाकीस्वारांच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. रात्रीच्या वेळी अंधारात किंवा पावसामध्ये जर एखाद्या दुचाकीस्वाराचे चाक यात अडकले, तर अत्यंत भीषण आणि प्राणघातक अपघात घडू शकतो. “या ठिकाणी एखादा गंभीर अपघात होऊन कोणाचा नाहक बळी गेल्यावरच महापालिकेच्या सुस्तावलेल्या यंत्रणेला जाग येणार आहे का?” असा संतप्त सवाल गायकवाड यांनी केला आहे.

प्रदीप गायकवाड यांनी महापालिकेच्या संपूर्ण शहरातील नागरी व्यवस्थापनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड मनपाचे मुख्यालय हे शहराचे हृदय मानले जाते. जर स्वतःच्या घराच्या दारात, मुख्यालयाच्या अवघ्या १० मीटर अंतरावर मनपा प्रशासन रस्त्याची सुरक्षा राखू शकत नाही, तर भोसरी, चिखली, कुदळवाडी, रावेत, मोशी किंवा सांगवीसारख्या उपनगरांमध्ये आणि अंतर्गत गल्ल्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? मुख्यालयातील ही बोंब म्हणजे संपूर्ण शहरात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा जिवंत पुरावा आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या वतीने संबंधित विभागाच्या कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक शब्दांत इशारा देण्यात आला आहे की, या चेंबरची दुरवस्था सुधारण्यासाठी तात्काळ नवीन दर्जेदार झाकण बसवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा. नागरिकांच्या जिवाशी खेळणारे हे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. जर २४ तासांच्या आत यावर योग्य ती उपाययोजना करण्यात आली नाही, तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!