news
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो कामगार, महिला व युवकांचा भव्य सहभाग‘यशस्वी’ संस्थेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ‘यशोगाथा’ विशेषांकाचे भव्य प्रकाशनपिंपरी-चिंचवड महापालिका ‘ह’ प्रभाग अध्यक्षा नगरसेविका तृप्तीताई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व १०० राष्ट्रध्वजांचे वितरणरहाटणीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला; महापालिका ‘ड’ प्रभाग सभापती सविताताई खुळे यांच्या हस्ते ध्वजवंदनपिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Home पिंपरी चिंचवड पिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

पिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी कन्या विद्यालयात माजी विद्यार्थी संघटना सभा उत्साहात; विकासाचा घेतला निर्धार | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘माझी शाळा, माझी जबाबदारी’; रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा दृढ़ निर्धार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय (पिंपरी वाघेरे) येथील माजी विद्यार्थी संघटनेची सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडली. ‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ असा ठाम निर्धार व्यक्त करत माजी विद्यार्थिनींनी शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना सुचवल्या आणि त्यांच्या यशस्वी पाठपुराव्याची ग्वाही दिली.
सभेत माजी विद्यार्थिनींनी आपल्या शालेय जीवनातील गतस्मृतींना उजाळा दिला. विद्यालयाच्या भौतिक सुविधांचा विकास करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल, अशा विविध संकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली. या संकल्पना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

या प्रसंगी पिंपरी महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरिजादेवी कुदळे, मीना नाणेकर, आरती भेगडे, स्वाती मोहिते, स्वाती धांगडे आणि डॉ. मीनाक्षी निनाळे यांनी आपले विचार मांडत विद्यालयाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा पुनरुच्चार केला.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी यांनी विद्यालयाच्या आजवरच्या प्रवासात आणि भविष्यातील विकासात माजी विद्यार्थिनींच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आगामी काळात राबवायच्या उपक्रमांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी काकडे यांनी केले, तर कार्यक्रमाचा गोड शेवट करत पर्यवेक्षिका वैशाली मेमाणे यांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थिनी व मान्यवरांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!