news
Home पिंपरी चिंचवड ‘वैयक्तिक अन् व्यावसायिक आयुष्यातील समतोलाचे धडे’; पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विशेष उपक्रम!

‘वैयक्तिक अन् व्यावसायिक आयुष्यातील समतोलाचे धडे’; पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विशेष उपक्रम!

पीसीटीच्या 'अंतर्गत तक्रार समिती'चा पुढाकार; कर्तबगार महिला उलगडणार आपल्या यशाची आणि संघर्षाची गाथा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पीसीसीओईमध्ये मंगळवारी रंगणार ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ चर्चासत्र!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना वैयक्तिक आयुष्यात योग्य समतोल राखण्यासाठी महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या सर्व प्रवासावर आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांच्या अनुभवांवर प्रकाश टाकण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (PCCOE) मधील अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर २०२६) सकाळी १०:३० वाजता महाविद्यालयाच्या मेकॅनिकल सेमिनार हॉलमध्ये या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे.

या चर्चासत्रात समाजातील विविध क्षेत्रांमधील कर्तबगार महिला आपले अनुभव व विचार मांडणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉ. कांचन देशपांडे (प्राचार्य, सिटी प्राईड स्कूल), ॲड. परिक्रमा खोत (कायद्या सल्लागार), डॉ. क्षमा उपलेंचवार (स्त्रीरोग तज्ज्ञ), सुजल शाह (संचालक, न्यू एज फायर फायटिंग कंपनी) हे सर्व तज्ज्ञ व व्यावसायिक महिला विविध क्षेत्रातील त्यांचे अनुभव, येणारी आव्हाने आणि दैनंदिन जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळण्याचे व्यावहारिक उपाय यावर संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाबाबत माहिती देताना अंतर्गत तक्रार समितीच्या उपाध्यक्ष सहा. प्रा. वृषाली भालेराव यांनी सांगितले की, “विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांना त्यांचा व्यावसायिक प्रवास, संघर्ष आणि यश यावर खुली चर्चा करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.”
या चर्चासत्राचे आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे, आणि अधिष्ठाता डॉ. एस. यू. भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!