news
‘जनगणना कायदा १९४८ अंतर्गत माहिती पूर्णपणे गोपनीय, अफवांवर विश्वास ठेवू नका’; महापालिका प्रशासनाचा स्पष्ट खुलासा!‘श्रीक्षेत्र आळंदीतील भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सामूहिक जबाबदारीने काम करणार’; महापालिका मुख्यालयात शिष्टमंडळाची बैठक!‘संघटन स्वातंत्र्य, वेतन व रोजगार सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा इशारा’; महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाची अपेक्षा!‘कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी दक्षता घ्या आणि लेखी अहवाल द्या’; ‘आप’ची प्रभाग कार्यालयाकडे आग्रही भूमिका!‘जन्म प्रमाणपत्र किंवा खासगी करार हा कायदेशीर दत्तक आदेशाचा पर्याय ठरू शकत नाही’; जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांच्या महत्त्वाच्या सूचना!
Home पुणे ‘संघटन स्वातंत्र्य, वेतन व रोजगार सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा इशारा’; महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाची अपेक्षा!

‘संघटन स्वातंत्र्य, वेतन व रोजगार सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा इशारा’; महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाची अपेक्षा!

कामगार हिताचे १४ ठराव एकमताने मंजूर; राज्यभरातून आलेल्या कामगार नेत्यांचा व प्रतिनिधींचा मोठा सहभाग | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चार कामगार संहिता रद्द करण्यासाठी राष्ट्रीय लढा उभारणार; इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांचा निर्धार!

पुणे / पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. २३ नोव्हेंबर २०२६मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: भारतीय कामगार चळवळ प्रदीर्घ संघर्षातून उभी राहिली असून कामगारांना मिळत असलेले वेतन, सामाजिक सुरक्षा, सेवा संरक्षण, संघटन स्वातंत्र्य आणि औद्योगिक न्यायाचे अधिकार अनेक दशकांच्या लढ्यातून व असंख्य कामगारांच्या बलिदानातून प्राप्त झाले आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहिता या कामगारांचे हक्क हिरावून घेणाऱ्या आहेत. त्यामुळे कामगारांचे मूलभूत अधिकार आणि हितसंबंध जपण्यासाठी या चारही कामगार संहिता रद्द करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यापक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी केले.

इंटकच्या महाराष्ट्र शाखेचे दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी व रविवारी (दि. २१ व २२ नोव्हेंबर २०२६) पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात कामगार हिताच्या दृष्टीने १४ ठराव मंजूर करण्यात आले.

नवीन चार कामगार संहिता लागू झाल्याने कामगारांच्या संघटन स्वातंत्र्यावर, रोजगार सुरक्षेवर, वेतन संरक्षणावर आणि सामाजिक सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचा इशारा डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी दिला. कामगारांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले. कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हा लढा केवळ एका संघटनेपुरता मर्यादित न ठेवता देशातील सर्व कामगार संघटना, कामगार नेते आणि कामगारांनी एकजुटीने पुढे न्यावा. कामगार चळवळीत एकजूट, शिस्त आणि संघटनात्मक बांधिलकी महत्त्वाची असून, देशभरातील संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून कामगारांच्या हितासाठी एकत्र यावे. महाराष्ट्रातील इंटक संघटनेने कामगारांच्या प्रश्नांवर अधिक व्यापक, आक्रमक आणि प्रभावी पद्धतीने काम करून चार कामगार संहिता रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन उभारावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या राज्यस्तरीय अधिवेशनास महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, इंटकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रप्रकाश सिंग, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार मोहन जोशी, नेते गोपाल तिवारी, राष्ट्रीय सचिव मुकेश तिगोटे, तसेच दिवाकर दळवी, नंदू खानविलकर, महेश करकरा, प्रवीण वाजपेयी, श्रद्धा कोद्रे, तुकाराम देकाते, जी. एस. गावडे, दत्तात्रय गुट्टे, सुनील देसाई, शशिकांत धुमाळ, राजेंद्र खराडे, मनोहर गडेकर, चेतन आगरवाल, विजय जाधव, शीतल कोतवाल, ॲड. फयाज शेख, कुमार मारणे, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, सचिन कदम, मंगेश पवार यांच्यासह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि राज्यभरातून आलेले कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाचे स्वागत महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले, तर आभार सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी मानले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!