news
‘जनगणना कायदा १९४८ अंतर्गत माहिती पूर्णपणे गोपनीय, अफवांवर विश्वास ठेवू नका’; महापालिका प्रशासनाचा स्पष्ट खुलासा!‘श्रीक्षेत्र आळंदीतील भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सामूहिक जबाबदारीने काम करणार’; महापालिका मुख्यालयात शिष्टमंडळाची बैठक!‘संघटन स्वातंत्र्य, वेतन व रोजगार सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा इशारा’; महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाची अपेक्षा!‘कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी दक्षता घ्या आणि लेखी अहवाल द्या’; ‘आप’ची प्रभाग कार्यालयाकडे आग्रही भूमिका!‘जन्म प्रमाणपत्र किंवा खासगी करार हा कायदेशीर दत्तक आदेशाचा पर्याय ठरू शकत नाही’; जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांच्या महत्त्वाच्या सूचना!
Home पिंपरी चिंचवड ‘श्रीक्षेत्र आळंदीतील भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सामूहिक जबाबदारीने काम करणार’; महापालिका मुख्यालयात शिष्टमंडळाची बैठक!

‘श्रीक्षेत्र आळंदीतील भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सामूहिक जबाबदारीने काम करणार’; महापालिका मुख्यालयात शिष्टमंडळाची बैठक!

प्रशांतभाऊ कुऱ्हाडे, पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यासह मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अधिकाऱ्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहकार्याचा हात; महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , दि. २३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: आगामी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र आळंदी येथे दाखल होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज (दि. २३ नोव्हेंबर) आळंदी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयात महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली.

कार्तिकी एकादशी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी स्वच्छता, आरोग्यसेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच अन्य आवश्यक नागरी सुविधांच्या नियोजनाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, स्वच्छता व्यवस्था, आरोग्यविषयक उपाययोजना आणि इतर नागरी सुविधांसाठी महापालिकेच्या संबंधित विभागांमार्फत सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपणे आणि श्रीक्षेत्र आळंदी येथे येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सामूहिक जबाबदारी असून, आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने परस्पर समन्वयातून काम करावे, अशी भूमिका महापौर रवि लांडगे यांनी मांडली.

“श्रीक्षेत्र आळंदी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची पवित्र भूमी आहे. कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे, हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.” — रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

या बैठकीस आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांतभाऊ कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाताताई तापकीर, यात्रा समितीच्या सभापती पूजाताई घुंडरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त कबीरबुवा लोंढे, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!