news
‘संघटन स्वातंत्र्य, वेतन व रोजगार सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा इशारा’; महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाची अपेक्षा!‘कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी दक्षता घ्या आणि लेखी अहवाल द्या’; ‘आप’ची प्रभाग कार्यालयाकडे आग्रही भूमिका!‘जन्म प्रमाणपत्र किंवा खासगी करार हा कायदेशीर दत्तक आदेशाचा पर्याय ठरू शकत नाही’; जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट यांच्या महत्त्वाच्या सूचना!‘बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार’; सीईओ अनिल कुमार सैनी यांची माहिती!‘सोयगावहून जुन्नर नगरीत जिद्दीने उभारला संसार’; परदेशी कुटुंबावर शोककळा, मान्यवरांकडून श्रद्धांजली!
Home पिंपरी चिंचवड ‘कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी दक्षता घ्या आणि लेखी अहवाल द्या’; ‘आप’ची प्रभाग कार्यालयाकडे आग्रही भूमिका!

‘कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी दक्षता घ्या आणि लेखी अहवाल द्या’; ‘आप’ची प्रभाग कार्यालयाकडे आग्रही भूमिका!

शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट आणि महिला शहराध्यक्षा कविता कोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रावेत येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणावर तात्काळ कठोर कारवाई करा; ‘आप’ महिला शहराध्यक्षा कविता कोंडे यांची मागणी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

रावेत: रावेत परिसरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता या सर्व अनधिकृत टपऱ्या व इतर अतिक्रमणांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या (आप) पिंपरी-चिंचवड महिला शहराध्यक्षा कविता कोंडे यांनी केली आहे. यासंदर्भात ‘आप’च्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयातील सहायक आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुखांना लेखी निवेदन दिले.

रावेत परिसरातील ज्ञानू होम ते डी. वाय. पाटील कॉलेज, धर्मराज चौक, गुरुद्वारा चौक आणि कॉलनी भागात फुटपाथसह मुख्य रस्त्यावर अनधिकृत टपऱ्या, फळ विक्रेते, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि उसाच्या गुऱ्हाळांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे.  फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले असून जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. या भागातील गंभीर वाहतूक कोंडीमुळे शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी, नागरिक तसेच रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची भीती वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आज (दि. २३ नोव्हेंबर) प्रभाग कार्यालयात निवेदन देण्यात आले. कोणाच्याही राजकीय किंवा स्थानिक दबावाला बळी न पडता रावेत येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांलगतचे सर्व अतिक्रमण तातडीने हटवावे, कारवाईनंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी दक्षता घ्यावी आणि केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल कळवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, महिला शहराध्यक्षा कविता कोंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रावेतमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका ‘आप’ने मांडली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!