news
‘सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले, किरकोळ ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा केंद्रावर हल्लाबोल!‘पक्षनिष्ठेने काम करणे ही माझी चूक ठरली का?’; सचिन काळभोर यांचा घरचा अहेर, इतर निष्ठावंतांचाही मुद्दा उपस्थित!‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी परिसंवादात तरुणाई मांडणार विचार’; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचा संयुक्त पुढाकार!‘शनिवारी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुस-लवळे रस्ता राहणार बंद’; पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून विशेष अधिसूचना जारी!‘औद्योगिक ऑटोमेशन आणि विशेष यंत्रनिर्मिती क्षेत्रात जागतिक संधींची रेलचेल’; पीसीयू येथील उद्योग परिसंवादात तज्ज्ञांचे विचार!
Home पिंपरी चिंचवड ‘सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले, किरकोळ ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा केंद्रावर हल्लाबोल!

‘सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले, किरकोळ ग्राहकांच्या खिशाला महागाईची झळ’; कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा केंद्रावर हल्लाबोल!

कष्टकरी संघर्ष महासंघ आणि रिक्षा-टॅक्सी चालक महासंघाचे संयुक्त आंदोलन; राजेश माने, लाला राठोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा सहभाग | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

देशातील महागाई कमी करण्यात केंद्र सरकार अपयशी — कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २२ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून महागाईला आळा घालण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली. ऑक्टोबर २०२६ मध्ये देशाचा घाऊक महागाई दर १२.२९ टक्क्यांवर पोहोचला असून, सप्टेंबर महिन्याच्या (११.३९ टक्के) तुलनेत अवघ्या एका महिन्यात ०.९० टक्क्यांची वाढ झाल्याने नागरिकांवरील आर्थिक ताण असह्य झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघाच्या वतीने चिंचवड येथील थरमॅक्स चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान नखाते यांनी महागाईच्या वाढत्या आकडेवारीकडे लक्ष वेधले. जानेवारीमध्ये १.८१ टक्के असलेला घाऊक महागाई दर जूनमध्ये ९.८७ टक्क्यांवर गेला आणि आता ऑक्टोबरमध्ये १२.१९ ते १२.२९ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. घाऊक मूल्य निर्देशांकाचे आधार वर्ष २०२२-२३ असून, सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये त्यात ०.७१ टक्क्यांची वाढ होऊन हा निर्देशांक ११३.३ वर पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्ये इंधन आणि वीज क्षेत्रातील किमतींत ४.७१ टक्क्यांची वाढ झाली असून, कच्चे तेल व नैसर्गिक वायूच्या किमतीही कडाडल्या आहेत. घाऊक बाजारात कच्चा माल, इंधन आणि धातू महागल्याने कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो. परिणामी, दुकानांतील आणि मॉलमधील वस्तू महाग होऊन त्याची थेट झळ किरकोळ ग्राहकांना बसत आहे.

केंद्र सरकार केवळ मोठमोठ्या जाहिराती आणि घोषणांमध्ये व्यस्त असून इंधन, खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे कष्टकरी, कामगार आणि रिक्षाचालकांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने महागाई कमी करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या निषेध आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक लाला राठोड, अंजना जाधव, लता साळुंखे, वहिदा शेख, विजय कोरे, विनय कदम यांच्यासह पदाधिकारी व कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!