news
‘जिल्हा कौशल्य विकास व रोजगार केंद्राचा मोठा पुढाकार’; अमरावतीत सोमवार २३ नोव्हेंबर रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!‘इतिहास संशोधन आणि सामाजिक कार्याचा संगम लाभणार’; पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची निवड जाहीर!‘जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये पिंपरी-चिंचवडचे नाव झळकवण्यासाठी प्रयत्नशील’; महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची मोठी घोषणा!‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये पिंपरी-चिंचवडचे नाव झळकवण्यासाठी प्रयत्नशील’; महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची मोठी घोषणा!

‘जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये पिंपरी-चिंचवडचे नाव झळकवण्यासाठी प्रयत्नशील’; महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची मोठी घोषणा!

४२ किमी फुल मॅरेथॉनसह चार गटांत स्पर्धा; indiarunning.com वर ऑनलाईन नोंदणीची सुविधा, शहराच्या लौकिकात पडणार मानाचा तुरा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडची आता जागतिक क्रीडा नकाशावरही छाप; १० जानेवारी २०२७ रोजी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चे भव्य आयोजन!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २० नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: देशभरात औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आता क्रीडा क्षेत्रातही जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. येत्या १० जानेवारी २०२७ रोजी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केली. या स्पर्धेचा समावेश जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

मॅरेथॉनच्या आयोजनासाठी अशा स्पर्धांचा अनुभव असलेल्या व्यावसायिक संस्थेची मदत घेतली जाणार असून, नोंदणी आणि अन्य व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केले जाणार आहे:

या मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन, २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा चार गटांचा समावेश असणार आहे. यामुळे सर्व वयोगटांतील स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंना सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटूंना indiarunning.com या अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी करता येणार आहे.

डी. वाय. पाटील मैदान – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक – भक्ती-शक्ती चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – टेल्को रोड – इंद्रायणीनगर – एम्पायर इस्टेट ब्रिज – काळेवाडी चौक – डांगे चौक – संत तुकाराम ब्रिज – रावेत – कॅन्टोन्मेंट – डी. वाय. पाटील मैदान.

“पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आजवर औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीमुळे देशभरात निर्माण झाली आहे. आता क्रीडा क्षेत्रातही शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून तरुणाई आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळेल. देश-विदेशातील धावपटूंना आकर्षित करणारी ही स्पर्धा शहराच्या लौकिकात भर घालणारी ठरेल.” — रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड)

“शहरात क्रीडा संस्कृती रुजविणे, नागरिकांचे आरोग्य उत्तम राखणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ओळख मिळवून देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेचा जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये समावेश व्हावा, यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील.” — डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी या मॅरेथॉनमुळे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी देश-विदेशातील धावपटू, क्रीडाप्रेमी आणि पर्यटकांना शहराकडे आकर्षित करण्याची मोठी संधी या निमित्ताने निर्माण होणार असल्याचे नमूद केले.

या पत्रकार परिषदेस महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, क्रीडा समिती सदस्य योगेश लांडगे, धर्मपाल तंतरपाळे, शाम जगताप, तानाजी बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!