news
‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!‘रस्ते बांधताना पावसाळी पाणी निचरा व्यवस्था अनिवार्य; कामगारांसाठी पीएमपीएमएल बससेवाही वाढवणार’; चाकण औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी ठोस आराखडा!
Home पिंपरी चिंचवड ‘देशाच्या सर्वांगीण विकासातील इंदिरा गांधींचे योगदान अविस्मरणीय’; पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त विशेष सोहळा!

‘देशाच्या सर्वांगीण विकासातील इंदिरा गांधींचे योगदान अविस्मरणीय’; पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त विशेष सोहळा!

सहआयुक्त पूनम मेहता, दत्तात्रय लांघी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती; प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘पीएमआरडीए’त भारतरत्न इंदिरा गांधींना विनम्र अभिवादन; अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच, या दिनाचे औचित्य साधून पीएमआरडीएतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

इंदिरा गांधी यांची जयंती १९ नोव्हेंबर रोजी देशभरात ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त पीएमआरडीए मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. देशाच्या सर्वांगीण विकासात आणि जागतिक स्तरावर भारताची ओळख अधिक भक्कम करण्यात इंदिरा गांधी यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे याप्रसंगी स्मरण करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त दत्तात्रय लांघी, अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता अभिमान भोसले, प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी विशाल ताटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे, प्रशासन विभागाच्या अधीक्षिका विशाखा चिंतल, वरिष्ठ लिपिक पांडुरंग मधुकर, कनिष्ठ लिपिक पंकज जाधव यांच्यासह पीएमआरडीएचे इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!