news
‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!‘रस्ते बांधताना पावसाळी पाणी निचरा व्यवस्था अनिवार्य; कामगारांसाठी पीएमपीएमएल बससेवाही वाढवणार’; चाकण औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी ठोस आराखडा!
Home मुख्यपृष्ठ ‘उघड्यावर कचरा जाळणाऱ्या आणि नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’; जिल्हाधिकारी डुडी यांचा प्रशासनाला दणका!

‘उघड्यावर कचरा जाळणाऱ्या आणि नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’; जिल्हाधिकारी डुडी यांचा प्रशासनाला दणका!

मुळशी धरणातून शाश्वत पाणीपुरवठा व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय; एमपीसीबी व ग्रामपंचायतींना संयुक्त पाहणीचे निर्देश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या; दिरंगाई खपवून घेणार नाही — जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे / पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता, येथील पायाभूत सुविधांच्या विकासकामांना तातडीने गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापनाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा सक्त इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

बैठकीत माहिती देण्यात आली की, या परिसरातील रस्ते विकासासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांचे तांत्रिक सादरीकरण पूर्ण झाले आहे. यावर समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी डुडी यांनी नोव्हेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आणि सर्व तांत्रिक बाबी अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत.

या नियोजनानुसार, रस्त्यांच्या कामांच्या निविदा २५ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील, तर २० डिसेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. माण, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील रस्त्यांचे अलाइनमेंट, भूसंपादन (Land Acquisition), टीडीआर (TDR) आणि डीपीआरसंदर्भातील सर्व अडचणी तातडीने दूर कराव्यात. तसेच, रिंगरोडच्या कामाला प्राधान्य देऊन मोजणी प्रक्रियेतील अडथळे त्वरित सोडवावेत, असे आदेश त्यांनी दिले.

परिसरातील आयटी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणारा पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आणि सांडपाणी प्रक्रियेच्या प्रश्नांचाही बैठकीत गंभीरपणे आढावा घेण्यात आला. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) कार्यान्वित करणे, सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे करणे आणि पाण्याच्या स्रोतांचे योग्य नियोजन करण्याबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने अहवाल सादर करावेत. मुळशी धरण आणि इतर संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाणीपुरवठ्याचे शाश्वत नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

परिसरात उघड्यावर कचरा जाळणे तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नाले व नदीपात्रात सोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून दोषी आस्थापनांना नोटिसा बजावाव्यात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. कचरा टाकण्याची ठिकाणे आणि प्रदूषणाची संभाव्य ठिकाणे निश्चित करून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे स्पष्ट करण्यात आले.

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. पुढील बैठकीपूर्वी सर्व विभागांनी आपापल्या विभागातील प्रलंबित अहवाल, निविदांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष सुरू केलेल्या कामांचा सविस्तर तपशील सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. या बैठकीत विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!