news
‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!‘रस्ते बांधताना पावसाळी पाणी निचरा व्यवस्था अनिवार्य; कामगारांसाठी पीएमपीएमएल बससेवाही वाढवणार’; चाकण औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी ठोस आराखडा!
Home पिंपरी चिंचवड ‘इंदिराजी गांधींचे धैर्य आणि देशाप्रती असलेली निष्ठा आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी’; शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे प्रतिपादन!

‘इंदिराजी गांधींचे धैर्य आणि देशाप्रती असलेली निष्ठा आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी’; शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांचे प्रतिपादन!

शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण; लोकशाही, सामाजिक न्याय आणि देशाच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्व. इंदिरा गांधी जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड काँग्रेसची अभिवादन सभेद्वारे विनम्र आदरांजली!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. १९ नोव्हेंबर २०२६मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, कणखर नेतृत्व, दूरदृष्टी आणि निर्णायक कार्यशैलीच्या प्रतीक असलेल्या भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. आज गुरुवार (दि. १९ नोव्हेंबर) पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित अभिवादन सभेत शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते स्व. इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी भावना व्यक्त करताना शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, “इंदिराजी गांधी यांचे धैर्य, कणखर नेतृत्व, देशाप्रती असलेली निष्ठा आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीची बांधिलकी ही आजही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि देशाच्या एकात्मतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करून आम्ही स्व. इंदिराजींना आदरांजली वाहत आहोत.”

या अभिवादन सभेत उपस्थित काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इंदिराजी गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देत देशविकासासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरितक्रांती, देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची उंचावलेली प्रतिष्ठा या त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा उपस्थितांकडून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप शिंदे, सुरज माने, रामकिसन माने, हरीश डोळस, हिराचंद जाधव, सरचिटणीस नबील मुल्ला, कृष्णा जाधव, गौरी नरसिंगे, रवींद्र कुंभार, प्रदीप शर्मा, गौतम सरपाते, रिझवान खान, विल्यम साळवी, अशोक माने, प्रमोद गायकवाड, राजेंद्र वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!