news
‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!‘रस्ते बांधताना पावसाळी पाणी निचरा व्यवस्था अनिवार्य; कामगारांसाठी पीएमपीएमएल बससेवाही वाढवणार’; चाकण औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी ठोस आराखडा!
Home पिंपरी चिंचवड ‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!

‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!

निराधार व विधवा महिलांच्या मदतीत वाढ आणि कष्टकरी महिलांना प्राधान्य देण्याची मागणी; राजेश माने, अनिल चौरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘लाडक्या बहिणीं’च्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार — मंत्री अदिती तटकरे यांचे आश्वासन!

मुंबई / पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या ९१ लाखांहून अधिक महिलांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळावा, या महत्त्वपूर्ण मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुंबई येथे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची भेट घेतली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर, केवायसी (e-KYC) प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असून, अनेक महिलांचे अर्ज प्राप्त होत असल्याने या विषयावर आपण मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करू, असे आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी दिले.

यापूर्वी १ सप्टेंबर रोजी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर ‘लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा’ काढून महिलांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. तसेच मागील महिन्यात राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासोबतही या विषयावर चर्चा झाली होती. त्याच अनुषंगाने आज मंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या.  योजनेतील पात्र व गरजू असूनही अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा.  ई-केवायसी (e-KYC) किंवा तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा संधी देण्यात यावी. निराधार, विधवा आणि परित्यक्त्या महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करावी. असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिलांना या योजनेत प्राधान्याने समाविष्ट करावे.

या भेटीदरम्यान आपली भूमिका मांडताना काशिनाथ नखाते म्हणाले की, “लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सामाजिक न्यायाचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक आधारावर अनेक महिलांनी आपल्या वर्षभराच्या खर्चाचे नियोजन केले होते. मात्र, अचानक लाभ बंद झाल्याने त्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.”

पात्र असूनही केवळ तांत्रिक कारणांमुळे एकही गरजू महिला लाभापासून वंचित राहू नये, ही महासंघाची ठाम भूमिका आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचा लढा व शासनाकडे पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील, असा निर्धार नखाते यांनी व्यक्त केला.

या शिष्टमंडळात कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, अनिल चौरे, सखाराम केदार आणि लाला राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!