news
‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!‘रस्ते बांधताना पावसाळी पाणी निचरा व्यवस्था अनिवार्य; कामगारांसाठी पीएमपीएमएल बससेवाही वाढवणार’; चाकण औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी ठोस आराखडा!
Home पिंपरी चिंचवड ‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!

‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!

अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या जागेचा मुद्दा उपस्थित करत सर्वसामान्यांच्या हक्काच्या जागेचे जतन करण्याची मागणी; प्रसाद भोईर व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

२४ कोटी ९७ लाखांच्या शालेय साहित्य खरेदीवर आणि १५० एकरवरील गोल्फ कोर्सवर चेतन पवारांचा हल्लाबोल; दोषी ठेकेदारांवर कारवाईची शिवसेनेची मागणी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ शाळांमधील सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या २४ कोटी ९७ लाख रुपयांच्या ‘ई-रुपी’ (e-RUPI) शालेय साहित्य योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत संपूर्ण साहित्य मिळाले नसताना ठेकेदारांची बिले कोणाच्या आदेशाने अदा करण्यात आली, याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी आक्रमक मागणी त्यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच, शहरातील कचरा आणि पाणीटंचाईचे मूलभूत प्रश्न कायम असताना १५० एकर जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याच्या अट्टहासाला शिवसेनेने कडाडून विरोध दर्शवला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या ठराव क्रमांक ९६० (दिनांक ५ ऑगस्ट २०२६) नुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी डीबीटीअंतर्गत (DBT) ई-रुपी पद्धतीने शालेय साहित्य पुरविण्यास मान्यता देण्यात आली होती. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रत्येक शाळेत प्रत्यक्ष पाहणी केली असता साहित्याचा पुरवठा आणि गुणवत्तेबाबत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. यासंदर्भात चेतन पवार यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या:

करारातील अटींचे पालन न करता आणि शाळांमध्ये पूर्ण साहित्य न पोहोचवताच संबंधित पुरवठादारांची बिले अदा करण्यात आली आहेत. ही बिले नेमकी कोणाच्या आदेशाने काढण्यात आली, याची चौकशी करावी.

ठरावात पारदर्शकतेचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत तफावत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेल्या साहित्याची स्वतंत्र पडताळणी, क्यूआर कोड स्कॅनिंग व ई-रुपी व्यवहारांची तपासणी आणि संपूर्ण योजनेचे लेखापरीक्षण (Audit) करावे.

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी आणि पुरवठादारांवर कठोर कारवाई करून त्यांचे करार रद्द करावेत व त्यांना काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.

शहरातील प्रस्तावित १५० एकर जागेवरील गोल्फ कोर्सच्या प्रकल्पावरून चेतन पवार यांनी महापालिका प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिक दुर्गंधी आणि पाणीटंचाईने त्रस्त आहेत. मात्र, या दैनंदिन समस्या सोडविण्याऐवजी प्रशासन गोल्फ कोर्सचे चोचले पुरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“शहरातील कचऱ्याची समस्या आयुक्तांना सोडविता येत नाही, नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गोल्फ कोर्सचे चोचले पुरविण्याची गरज काय? नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम पाडून त्याची जागा धूळखात पडलेली असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी एकही पुरेसे क्रीडांगण नाही. हा गोल्फ कोर्स प्रकल्प सर्वसामान्यांसाठी आहे की मोजक्या श्रीमंतांच्या मनोरंजनासाठी? सार्वजनिक जागा विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असेल, तर त्याला आमचा ठाम विरोध राहील.” — चेतन पवार (शहरप्रमुख, शिवसेना – उबाठा)

यापूर्वी पुनावळे येथेही जागा देण्याच्या विषयाला शिवसेनेने विरोध केला होता. आता पुन्हा जनतेचे कोट्यवधी रुपये आणि सार्वजनिक जागा गोल्फ कोर्ससारख्या प्रकल्पासाठी वापरण्याचा घाट घातला जात असेल, तर प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी पवार यांनी केली.

या पत्रकार परिषदेस मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, अनिल सोमवंशी, पार्थ गुरव, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, तुषार नवले, गणेश आहेर, नितीन घोलप, रावसाहेब थोरात, दिलीप सावंत, नितीन बोंडे, कैलास नेवासकर, शिवाजी शेळके, नाथाभाऊ खांडेभराड, विकास एकशिंगे, सतिश मरळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!