news
‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!‘रस्ते बांधताना पावसाळी पाणी निचरा व्यवस्था अनिवार्य; कामगारांसाठी पीएमपीएमएल बससेवाही वाढवणार’; चाकण औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी ठोस आराखडा!
Home पिंपरी चिंचवड ‘चार हजार कोटींची बिले प्रलंबित असताना बगलबच्च्यांचे खिसे भरण्याचा प्रयत्न’; पिंपरी-चिंचवड मनपाच्या वादग्रस्त निविदेविरोधात संताप!

‘चार हजार कोटींची बिले प्रलंबित असताना बगलबच्च्यांचे खिसे भरण्याचा प्रयत्न’; पिंपरी-चिंचवड मनपाच्या वादग्रस्त निविदेविरोधात संताप!

३६ हजार मातांना पौष्टिक खाऊ आणि १७ हजार नवजात मुलींसाठीच्या योजनेवरून वादंग; दुष्काळाच्या संकटात काटकसर करण्याऐवजी उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महापालिकेची ७५ कोटींची ‘बाळंतविडा’ योजना म्हणजे ठेकेदारांचे खिसे भरण्याचा घाट; निविदा रद्द करण्याची मारुती भापकर यांची आक्रमक मागणी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ७५ कोटी रुपयांची ‘बाळंतविडा’ योजना तातडीने रद्द करावी, अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना आणि ठेकेदारांची सुमारे चार हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बिले थकीत असतानाही ही योजना राबवणे म्हणजे केवळ ‘बगलबच्चे’ आणि ठेकेदारांचे खिसे भरण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ३६ हजार मातांना पौष्टिक खाऊ आणि १७ हजार नवजात मुलींना बाळंतविडा देण्यासाठी नवीन योजना आणण्यात आली आहे. या योजनेसाठी एका वर्षासाठी २५ कोटी रुपये आणि तीन वर्षांसाठी ७५ कोटी रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.

या योजनेवर तीव्र आक्षेप घेताना मारुती भापकर यांनी पुढील प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहेत.  महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झालेली असून महापालिका कर्जबाजारी झाल्याचे चित्र आहे. एका बाजूला कर्ज उभारणीचे प्रयत्न सुरू असताना आणि पदाधिकारी काटकसरीचे धोरण सुचवत असताना, ७५ कोटींचा हा खर्च अनाठायी असल्याचे भापकर यांनी म्हटले आहे. विकासकामे केलेल्या ठेकेदारांची सुमारे ४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची बिले अद्याप प्रलंबित असताना नवीन खर्चाची निविदा काढणे गैरवाजवी आहे.  संपूर्ण राज्यावर व देशात दुष्काळाचे संकट असताना अशा पद्धतीने निधी खर्च करणे योग्य नाही.  शहरात अंगणवाडी सेविकांमार्फत राज्य सरकारकडून प्रसूतीपूर्वी मातांना खुराक आणि बालकांसाठी किट देण्याची योजना आधीच सुरू आहे. शासन सर्वत्र थेट लाभ हस्तांतरण (DBT) धोरण राबवत असताना, महापालिकेने पुन्हा स्वतंत्र निविदा काढण्याचा घाट का घातला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या योजनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, ही योजना लागू होऊ नये यासाठी शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने या योजनेची निविदा रद्द करावी; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मारुती भापकर यांनी दिला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!