news
‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!‘अचानक लाभ बंद झाल्याने महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडले’; काशिनाथ नखाते यांचा महिला व बालविकास मंत्र्यांकडे जोरदार आग्रह!‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!‘रस्ते बांधताना पावसाळी पाणी निचरा व्यवस्था अनिवार्य; कामगारांसाठी पीएमपीएमएल बससेवाही वाढवणार’; चाकण औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी ठोस आराखडा!
Home पिंपरी चिंचवड ‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!

‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या कार्याचे स्मरण’; पिंपरी-चिंचवड मनपा मुख्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न!

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते इंदिराजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण; जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी दिले सामूहिक शपथेचे वाचन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतरत्न इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन; महापौर रवि लांडगे यांच्या उपस्थितीत घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. आज गुरुवार (दि. १९ नोव्हेंबर) महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

इंदिरा गांधी यांची जयंती देशभरात ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून साजरी केली जाते. या दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेतली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी या शपथेचे वाचन केले:

“आम्ही हिंसाचाराचा कधीही अवलंब करणार नाही. धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे तसेच राजकीय व आर्थिक गाऱ्हाणी ही शांततामय आणि संवैधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवू.”

या अभिवादन प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता जाहिरा मोमीन, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!