news
‘जिल्हा कौशल्य विकास व रोजगार केंद्राचा मोठा पुढाकार’; अमरावतीत सोमवार २३ नोव्हेंबर रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!‘इतिहास संशोधन आणि सामाजिक कार्याचा संगम लाभणार’; पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची निवड जाहीर!‘जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये पिंपरी-चिंचवडचे नाव झळकवण्यासाठी प्रयत्नशील’; महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची मोठी घोषणा!‘कचरा व पाणीटंचाई कायम असताना गोल्फ कोर्सचे चोचले कशासाठी?’; १५० एकर जागेवरील प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध!‘भाविकांच्या श्रद्धेच्या पैशांची लूट खपवून घेणार नाही; संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करा’; शिरगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘इतिहास संशोधन आणि सामाजिक कार्याचा संगम लाभणार’; पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची निवड जाहीर!

‘इतिहास संशोधन आणि सामाजिक कार्याचा संगम लाभणार’; पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची निवड जाहीर!

संदीप तापकीर यांच्या शंभरहून अधिक संपादित ग्रंथांचा व डॉ. सुहास कांबळे यांच्या लोकप्रतिनिधी व वैद्यकीय अनुभवाचा संमेलनाला लाभ; नवनिर्वाचितांचा विशेष सत्कारl© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप तापकीर, तर स्वागताध्यक्षपदी डॉ. सुहास कांबळे; २० डिसेंबरला मोशीत रंगणार साहित्यिकांची मांदियाळी!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २० नोव्हेंबर २०२६मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: मोशी येथे आगामी २० डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक व साहित्यिक संदीप भानुदास तापकीर यांची, तर स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ तथा नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कवी अरुण बोऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि परिषदेचे कार्याध्यक्ष सोपान खुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत या दोन्ही निवडींवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले संदीप भानुदास तापकीर हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक आणि संशोधक म्हणून परिचित आहेत:

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर जिल्हानिहाय आधारित त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवराय’ या मराठी शिवचरित्राचा हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. याशिवाय शंभरहून अधिक पुस्तकांचे संपादन करण्याचे महत्त्वपूर्ण साहित्यिक कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या योगदानामुळे यंदाच्या संमेलनाला ऐतिहासिक वैचारिक उंची लाभणार आहे.

स्वागताध्यक्षपदी निवड झालेले डॉ. सुहास कांबळे हे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ असून मोशी येथील साईनाथ रुग्णालयाचे संचालक आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे आणि कला-साहित्याची विशेष आवड असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. वैद्यकीय सेवा, सामाजिक कार्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून असलेला त्यांचा अनुभव साहित्य संमेलनाच्या आयोजनाला निश्चितच नवी ऊर्जा देणारा ठरेल.

पाचवे इंद्रायणी साहित्य संमेलन २० डिसेंबर रोजी मोशी येथील जयगणेश सभागृहात पार पडणार असून, यामध्ये नामवंत साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक आणि मान्यवरांची मांदियाळी रसिकांना अनुभवता येणार आहे.

दरम्यान, निवडी जाहीर झाल्यानंतर इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने नवनिर्वाचित स्वागताध्यक्ष डॉ. सुहास कांबळे आणि संमेलनाध्यक्ष संदीप तापकीर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यकारिणी बैठक आणि सत्कार समारंभास डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, दामोदर वहिले, योगेश कोंढाळकर, श्रीहरी तापकीर, माणिक सस्ते, काळुराम सस्ते, संगीता थोरात, सुनील जाधव, तेजस्विनी देशमुख, संतोष सस्ते, अशोक ढोकले, महिपती साठे, अलंकार हिंगे, गोविंद आल्हाट, साहित्यिक श्रीकांत चौगुले, व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, निलेश गावडे, गणेश साहेबराव सस्ते, संतोष गोलांडे, भानुदास तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!