news
‘पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा प्रयत्न’; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन!‘तेजश्री अडिगे दिग्दर्शित ‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेचे बाली येथे यशस्वी सादरीकरण’; २० कलाकारांच्या सन्मानाने कला क्षेत्रात उत्साह!‘मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित व प्रभावी करा’; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश!‘गुरुवारी दिवसभर पाणीकपात, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे’; महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन!‘शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा हवा’; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा हवा’; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन!

‘शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा हवा’; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन!

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे (TISS) विद्यार्थी करणार प्रत्यक्ष क्षेत्रभेटी; रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन व शहरी नियोजनावर सखोल चर्चा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा अभ्यास; महापौर रवि लांडगे यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर संवाद!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २४ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी आव्हाने यांचा अभ्यास करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), मुंबई येथील संशोधक विद्यार्थ्यांनी महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. पुढील दहा दिवस हे विद्यार्थी शहरातील विविध विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि नागरी विकासाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहेत.

या संवादादरम्यान महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या विकासप्रवासाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.  १९७० च्या दशकात अवघी ३० हजार लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या २००१ मध्ये १० लाखांपर्यंत, तर २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे १७ लाखांवर पोहोचली. औद्योगिकीकरण, रोजगाराच्या संधी आणि नागरी सुविधांमुळे सध्या शहराची अंदाजित लोकसंख्या सुमारे ३६ लाखांपर्यंत गेली आहे.वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, जलवाहिन्या, मलनिस्सारण व्यवस्था आणि मूलभूत सुविधांच्या विस्तारावर महापालिका सातत्याने भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औद्योगिक नगरी ते ‘गार्डन सिटी’ असा प्रवास, स्वच्छतेतील राष्ट्रीय पुरस्कार, उद्योगविश्वाचे योगदान, कचरा व्यवस्थापन, घनकचरा प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताण अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटींद्वारे अभ्यासपूर्ण निरीक्षणे व सूचना मांडाव्यात, असे आवाहनही महापौरांनी केले.

“पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांच्या विस्तारापुरता मर्यादित नसून, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनातून समोर येणारी निरीक्षणे आणि सूचना शहराच्या भविष्यातील विकास नियोजनासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील.” — रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

“शहराच्या विकासप्रक्रियेत शैक्षणिक संस्था आणि संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, नागरिकांशी संवाद आणि अभ्यासपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शहरी व्यवस्थापनाची व्यापक माहिती मिळेल. अशा उपक्रमांमुळे शिक्षण, संशोधन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल.” — रविना सागर आंगोळकर (सभापती, शिक्षण समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)

या प्रसंगी शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, नगरसेविका श्रुती वाकडकर, उपायुक्त अण्णा बोदडे आणि सीएसआर (CSR) कक्षाचे विजय वावरे उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!