news
‘पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा प्रयत्न’; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन!‘तेजश्री अडिगे दिग्दर्शित ‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेचे बाली येथे यशस्वी सादरीकरण’; २० कलाकारांच्या सन्मानाने कला क्षेत्रात उत्साह!‘मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित व प्रभावी करा’; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश!‘गुरुवारी दिवसभर पाणीकपात, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे’; महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन!‘शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा हवा’; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘गुरुवारी दिवसभर पाणीकपात, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे’; महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन!

‘गुरुवारी दिवसभर पाणीकपात, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे’; महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन!

निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व स्थापत्य विषयक कामांमुळे संपूर्ण शहराचा पुरवठा राहणार बंद; २७ नोव्हेंबर रोजी सकाळी अनियमित पुरवठ्याची शक्यता | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महत्त्वाची बातमी: देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २४ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा व्यवस्थेतील अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

महापालिकेच्या सेक्टर क्रमांक २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा विषयक स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानुसार पुढीलप्रमाणे पाणीपुरवठ्याचे नियोजन असेल. गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पुरवठा बंद राहणार असल्याने शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुरुस्तीच्या कामानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी घरामध्ये आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. तसेच, शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!