news
Home अमरावती ‘कोतवाल भरतीचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध’; अमरावतीच्या मोर्शी तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारणे सुरू!

‘कोतवाल भरतीचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध’; अमरावतीच्या मोर्शी तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारणे सुरू!

११ नोव्हेंबरला होणार लेखी परीक्षा; पारदर्शक वातावरणात प्रक्रिया राबवण्याचे प्रशासनाचे आश्वासन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मोर्शी तालुक्यात कोतवालांच्या ४ रिक्त पदांसाठी पदभरती सुरू; १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारणार!

अमरावती / मोर्शी प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मोर्शी: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात ‘कोतवाल’ संवर्गातील रिक्त असलेली ४ पदे भरण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत तालुक्यातील पांढी, लेहगाव, धामणगाव आणि मंगरूळ या साज्यांमध्ये प्रत्येकी एका पदाची भरती केली जाणार असल्याची माहिती कोतवाल निवड समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली.

शासकीय नियमांनुसार व आरक्षणानुसार खालीलप्रमाणे साजा आणि प्रवर्गासाठी ही पदभरती होणार आहे. पांढी साजा  खुला प्रवर्ग (Open), लेहगाव साजा  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), धामणगाव साजा  भटका जमाती-क (NT-C), मंगरूळ साजा  सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC)

 

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत  १७ ऑक्टोबर २०२६ (सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत)
(इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तहसीलदार कार्यालय, मोर्शी येथे जमा करायचे आहेत. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.)

 

पात्र उमेदवारांची अंतिम यादी  ०३ नोव्हेंबर २०२६ , लेखी परीक्षेची तारीख व वेळ  ११ नोव्हेंबर २०२६ (दुपारी १२.०० ते १.३० वाजेदरम्यान), नियुक्ती आदेश वाटप  २६ नोव्हेंबर २०२६

 

ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक वातावरणात तहसीलदार सागर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मोर्शी तालुक्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!