news
Home पिंपरी चिंचवड ‘झोपेत असताना विजेचा तीव्र झटका बसून तरुणाचा अंत’; पुण्याच्या सोमनाथ नगरमधील थरारक घटना!

‘झोपेत असताना विजेचा तीव्र झटका बसून तरुणाचा अंत’; पुण्याच्या सोमनाथ नगरमधील थरारक घटना!

वडगाव शेरीतील एका खोलीत घडली घटना; दोन दिवस मृतदेह बंद खोलीत पडून राहिल्याने उघडकीस आला प्रकार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पुण्यात खळबळ: इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग माने खाली ठेवून झोपणे बेतले जीवावर; ३० वर्षीय आयटी अभियंत्याचा शॉक लागून करुण अंत!

पुणे/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग माने खाली ठेवून झोपल्यामुळे विजेचा तीव्र झटका (Electric Shock) बसून ३० वर्षीय तरुण आयटी अभियंत्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वडगाव शेरी परिसरातील सोमनाथ नगर भागात ही घटना घडली.
रोहन कुबाडी (वय ३०) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन हा अविवाहित असून पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तो गेल्या तीन महिन्यांपासून सोमनाथ नगर येथील एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहत होता.

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचा संशय आहे. रोहन याच्या मोबाईलवर नातेवाईक व मित्रांकडून वारंवार फोन करूनही तो प्रतिसाद देत नव्हता. गुरुवारी (८ ऑक्टोबर) त्याच्या बंद खोलीतून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने घरमालकाने संशय व्यक्त केला.
घरमालकाने तातडीने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता, रोहनचा मृतदेह खाटेवर फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत आढळला. तसेच मृतदेहाजवळ रक्ताचे थारोळे पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, रोहन हा मान दुखापतीवर उपचारासाठी किंवा शेकण्यासाठी ‘इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग’चा वापर करत होता. झोपेत असताना ही बॅग चालूच राहिली असावी किंवा त्यात शॉटसर्किट होऊन अचानक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!