news
‘आईच्या हळव्या आठवणी अन् मिश्कील ओळींचा खळखळाट’; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कवी वैभव जोशींचा ‘द मनमौजी’ बहरला!‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!‘पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा’; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक प्रदान!‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!
Home पिंपरी चिंचवड ‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!

‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!

डिप्लोमा इन इंटिरिअर डिझाईनच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रारंभ; पीसीईटी विश्वस्त मंडळाकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक: प्रख्यात आर्किटेक्ट वासवी मुळे

आकुर्डी, पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “इंटेरियर डिझायनर म्हणून काम करताना पारंपरिक कल्पनांच्या पलीकडे जाऊन सर्जनशील दृष्टिकोन ठेवून स्वतःचे व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रात नव्या पिढीतील होतकरू युवकांना आपल्या कल्पनाशक्ती सादर करण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत. अनेक डिझायनर जेव्हा एकत्र येऊन महत्त्वपूर्ण योगदान देतात, तेव्हाच उत्कृष्ट कलाकृती निर्माण होते,” असे प्रतिपादन प्रख्यात आर्किटेक्ट वासवी मुळे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन येथे प्रथम वर्ष ‘डिप्लोमा इन इंटिरिअर डिझाईन’च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभात त्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी, लक्ष्मण तोरगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक अपेक्षा, विविध अध्ययनाच्या संधी तसेच इंटिरिअर डिझाईनच्या व्यापक क्षेत्राची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कुतूहल, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासाने डिझाईन क्षेत्रामध्ये आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान आर्किटेक्ट वासवी मुळे यांनी स्वतःचे व्यावसायिक अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर करत त्यांना डिझायनिंग क्षेत्रातील बारकावे समजावून सांगितले.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!