news
‘आईच्या हळव्या आठवणी अन् मिश्कील ओळींचा खळखळाट’; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कवी वैभव जोशींचा ‘द मनमौजी’ बहरला!‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!‘पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा’; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक प्रदान!‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!
Home पिंपरी चिंचवड ‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!

‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!

कष्टकरी कामगार महासंघाकडून उप पोस्ट मास्तर केंगार, टपाल सहाय्यक वाडेकर व पोस्टमन बांधवांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा अतिशय महत्त्वपूर्ण: कामगार नेते काशिनाथ नखाते

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “तंत्रज्ञान बदलले, संवादाची साधने बदलली; पण टपाल कर्मचाऱ्यांची सेवाभावना आणि कर्तव्यनिष्ठा आजही कायम आहे. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप, ई-मेलच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदांत निरोप पोहोचत असले, तरी टपाल खात्याची विश्वासार्हता आणि पोस्टमनचे नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आजही अढळ आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
‘जागतिक टपाल दिना’चे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रामाणिक आणि कष्टाळू टपाल कर्मचारी तसेच पोस्टमन बांधवांचा निगडी प्राधिकरणात महासंघाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि मिठाई देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्या वेळी नखाते बोलत होते.

कामगार नेते काशिनाथ नखाते पुढे म्हणाले की, “लाल रंगाची टपालपेटी आणि खाकी वर्दीतील पोस्टमन यांचे नाते भारतीय समाजजीवनात विसरणे अशक्य आहे. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता प्रत्येक घरापर्यंत पत्रे, पार्सल आणि महत्त्वाच्या शासकीय सेवांशी संबंधित कागदपत्रे पोहोचविण्याचे काम पोस्टमन बांधव अत्यंत निष्ठेने करत आहेत. अगदी कोरोनाच्या अत्यंत कठीण काळातही स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता त्यांनी जनतेला अविरत सेवा दिली. या समर्पित कार्याचा सन्मान करणे ही समाजाची मोठी नैतिक जबाबदारी आहे.”

या सन्मान सोहळ्याबद्दल टपाल कर्मचाऱ्यांनी कष्टकरी कामगार महासंघाचे मनापासून आभार मानले. या प्रसंगी उप पोस्ट मास्तर कृष्णकुमार केंगार, टपाल सहाय्यक रूपाली वाडेकर, महासंघाचे सहदेव होनमाने, इरफान चौधरी, मनोज यादव, तसेच पोस्टमन शीतल नागवे, अश्विनी जाधव, वर्षा सुभे, अनंत जाधव, सर्जेराव ठोंबरे, संतोष चव्हाण, संदेश गायकवाड, अमृत वाघमारे, घनश्याम पाटील, वैशाली कोल्हे, दत्तात्रय जाधव, बापू डोळसे व लीना बेगमपुरे आदी पदाधिकारी व पोस्ट कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!