news
‘आईच्या हळव्या आठवणी अन् मिश्कील ओळींचा खळखळाट’; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कवी वैभव जोशींचा ‘द मनमौजी’ बहरला!‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!‘पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा’; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक प्रदान!‘इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात नव्या पिढीला संधींची कवाडे उघडी’; पीसीईटीच्या आकुर्डी संकुलात स्वागत सोहळा संपन्न!‘कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांचा गौरव करणे नैतिक जबाबदारी’; जागतिक टपाल दिनी निगडीत सोहळा!
Home पिंपरी चिंचवड ‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!

‘नागरी सुविधांची टोलवाटोलवी खपवून घेणार नाही’; पिंपरी महापालिकेत कब्रस्तानाच्या जागेवरून मुस्लिम बांधवांचा संताप!

खासगी जागेचा पर्याय सुचवल्याने भावना दुखावल्या; चिखली-कुदळवाडीतील कब्रस्तानाचा प्रश्न तडीस नेण्याचा नरेंद्र बनसोडेंचा निर्धार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाच्या मागणीवरून डी.पी. सुनावणीत तीव्र नाराजी; काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडेंचा अधिकाऱ्यांना जाब!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली-कुदळवाडी परिसरातील मुस्लिम समाजासाठी मंजूर असलेली कब्रस्तानाची जागा महापालिकेच्या विकास आराखड्यात (D.P. Plan) पूर्णपणे समाविष्ट करण्यात यावी, या मागणीवरून आयोजित डी.पी. सुनावणीदरम्यान मोठा गदारोळ झाला. सुनावणीवेळी महापालिका अधिकाऱ्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

सुनावणीदरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी उत्तरेश्वर नामदेव लोंढे यांनी “मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्ती, जमीनमालक अथवा अन्य व्यक्तींची खासगी जागा कब्रस्तानासाठी वापरावी,” असा अजब सल्ला/पर्याय सुचवल्याचे समोर आले. या वक्तव्यामुळे उपस्थित मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या असून प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला.
कब्रस्तानावरासारख्या अत्यंत धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयावर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संयम आणि जबाबदारीने भूमिका मांडायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

नागरिकांनी स्पष्ट केले की, मुस्लिम समाजाकडून कोणत्याही व्यक्तीच्या खासगी मालमत्तेची मागणी करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या मालकीची आणि नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांशी संबंधित असलेल्या कब्रस्तानाच्या जागेचा विकास आराखड्यात (DP Plan) अधिकृतरीत्या समावेश करावा, हीच प्रमुख मागणी आहे.
चिखली-कुदळवाडी परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दफनभूमीसारख्या अत्यावश्यक सुविधेचे योग्य नियोजन करणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे या जागेचा विकास आराखड्यात कायमस्वरूपी समावेश करून प्रश्नावर मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी घटनास्थळी ठाम भूमिका घेत महापालिका अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. “नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांवर प्रशासन अशी टोलवाटोलवी करू शकत नाही. संवेदनशील विषयांवर सन्मानपूर्वक संवाद साधणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.
नरेंद्र बनसोडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे नागरिक व समाजबांधवांकडून कौतुक करण्यात आले. चिखली-कुदळवाडी कब्रस्तानाचा प्रश्न तडीस जाईपर्यंत महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला जाईल, असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!