news
Home पिंपरी चिंचवड ‘पिंपरी-चिंचवडमध्ये सेवेची ज्योत पेटली’; भोसरीत भाजपची ऐतिहासिक ‘विकसित भारत संकल्प सभा’!

‘पिंपरी-चिंचवडमध्ये सेवेची ज्योत पेटली’; भोसरीत भाजपची ऐतिहासिक ‘विकसित भारत संकल्प सभा’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन नबीन यांचे डिजिटल मार्गदर्शन; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात अडीच हजार कार्यकर्त्यांचा जयघोष | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’: भोसरीत २५०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या भव्य उपस्थितीत ‘सेवा ज्योती यात्रा’ व ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात!

भोसरी, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या समृद्ध, सशक्त आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेला नवी गती देण्यासाठी भोसरी येथे भव्य-दिव्य वातावरणात ‘सेवा ज्योती यात्रा’ आणि ‘विकसित भारत संकल्प सभा’ अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडली. ‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’ या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची विशेष उपस्थिती होती.
या महासभेचे मुख्य आकर्षण म्हणजे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीनजी नबीन यांचे डिजिटल माध्यमातून मिळालेले थेट मार्गदर्शन. लाईव्ह स्क्रीनद्वारे संवाद साधत दोन्ही नेत्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जनसेवा, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी कटिबद्ध राहण्याचा मोलाचा संदेश दिला.

सभेत मार्गदर्शन करताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांचा सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांचा कार्यकाळ हा केवळ राजकीय प्रवास नसून, तो देशाच्या पुनरुत्थानाचा आणि जनसेवेचा महायज्ञ आहे. ‘सेवा ज्योती यात्रे’च्या माध्यमातून पेटवलेली ही सेवेची ज्योत पिंपरी-चिंचवडच्या घराघरांत पोहोचवून ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध आहे. मोदीजी आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.”

या राज्यस्तरीय स्वरूपाच्या महासभेला शहरातील २५०० हून अधिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. संपूर्ण सभा परिसर ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
या प्रसंगी भाजप प्रदेश उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये, आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरशेठ जगताप, आमदार अमितभाऊ गोरखे, आमदार सौ. उमाताई खापरे, महापौर रवीभाऊ लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांतभाऊ शितोळे, उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर, संघटन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, सरचिटणीस विकासदादा डोळस, मधुकरभाऊ बच्चे, वैशालीताई खाड्ये, संजयभाऊ पटणी, माजी प्राधिकरणाध्यक्ष सदाशिवराव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रभारी राजेश अण्णा पिल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेशभाऊ यादव, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई पालांडे यांच्यासह शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!