news
Home पिंपरी चिंचवड रेड झोन निर्बंध हटविणे, कचरा प्रक्रिया प्रकल्प व अग्निशमन केंद्रासाठी जागा मिळण्याबाबत खडकी हेडक्वार्टर्स येथे बैठक संपन्न

रेड झोन निर्बंध हटविणे, कचरा प्रक्रिया प्रकल्प व अग्निशमन केंद्रासाठी जागा मिळण्याबाबत खडकी हेडक्वार्टर्स येथे बैठक संपन्न

रेड झोन निर्बंध हटवण्यासह विविध जागांबाबत खडकीत महत्त्वाची बैठक; पिंपरीच्या विकासाला गती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पाऊल!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी (Defence Department) संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर अत्यंत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन शहराच्या विकासाशी निगडित विषय त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. या भेटीची गांभीर्याने दखल घेत संरक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज खडकी हेडक्वार्टर्स येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे उपस्थित होते. त्यांनी कर्नल रवि कुमार गरगोत्रा यांच्यासोबत शहरातील प्रलंबित मुद्द्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.

 मॅगझिन चौक येथील ‘अम्युनेशन डेपो’ (Ammunition Depot) आधीच स्थलांतरित झालेला असल्याने त्या परिसरावरील ‘रेड झोन’चे निर्बंध पूर्णतः हटवण्याबाबत आवश्यक कार्यवाहीवर बैठकीत भर देण्यात आला. यामुळे हजारो नागरिकांच्या बांधकामे व मालमत्तांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.वाढत्या लोकसंख्येच्या कचरा व्यवस्थापनासाठी हॉटेल कलासागरजवळील संरक्षण विभागाची जागा महापालिकेस उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. पिंपळे सौदागर व लगतच्या परिसरातील आपत्कालीन सेवा सक्षम करण्यासाठी नवीन अग्निशमन केंद्रासाठी (Fire Station) जागा उपलब्ध करून देण्यावर सकारात्मक सहमती दर्शवण्यात आली.

“पिंपरी-चिंचवडमधील रेड झोनसह संरक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याची सकारात्मक दखल घेतल्याने आज ही पुढील स्तरावरील चर्चा झाली. मॅगझिन चौक येथील रेड झोन निर्बंध हटवणे, कचरा प्रकल्प आणि अग्निशमन केंद्रासाठी जागा मिळवणे या विषयांचा सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देणे हेच आमचे ध्येय आहे.”
— रवि लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड)
या बैठकीस नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, सहाय्यक संचालक संदेश खडतरे, खडकी हेडक्वार्टर्सचे जनसंपर्क अधिकारी किरण पवार यांच्यासह संरक्षण विभाग व महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!