news
Home पिंपरी चिंचवड ‘भोसरीत रंगली रोड रेस स्केटिंगची थरारक स्पर्धा’; गुणवंत खेळाडूंचा योगदान प्रतिष्ठानकडून सन्मान!

‘भोसरीत रंगली रोड रेस स्केटिंगची थरारक स्पर्धा’; गुणवंत खेळाडूंचा योगदान प्रतिष्ठानकडून सन्मान!

पिंपरी पालिकेच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग; अवनीश व आयुषच्या यशाने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत अवनीश भोईर अन् आयुष सायकरची चमकदार कामगिरी; योगदान प्रतिष्ठानतर्फे यथोचित सत्कार!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा ‘योगदान प्रतिष्ठान’च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा चिंचवडचे नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी या बालखेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली व पुढील क्रीडा प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक ३ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मारुती कंद स्केटिंग ग्राउंड, भोसरी आणि PCNDA ग्राउंड, भोसरी येथे या जिल्हास्तरीय रोड रेस स्केटिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता.

 प्रोफेशनल इनलाईन स्केटिंग (अंडर-१७) या वयोगटात उत्कृष्ट कौशल्य दाखवत अवनीशने २ कांस्यपदकांची (Bronze Medals) कमाई केली. – कु. अवनीश राहुल भोई

 

एस. बी. पाटील कॉलेज (रावेत) येथील इयत्ता १२ वी सायन्सचा विद्यार्थी असलेल्या आयुषने प्रोफेशनल इनलाईन स्केटिंग (अंडर-१९) या अत्यंत चुरशीच्या गटात उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय स्थान पटकावले आणि तब्बल ४ रौप्यपदके (Silver Medals) आपल्या नावावर केली. – कु. आयुष राकेश सायकर

 

खेळाडूंच्या या दैदीप्यमान यशाबद्दल पिंपरी-चिंचवड स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अशोक गुंजाळ सर यांनी दोन्ही खेळाडूंचे विशेष कौतुक करून त्यांना भावी क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे, नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी खेळाडूंचा सत्कार करताना सांगितले की, “अशा लहान वयात मिळवलेले हे यश केवळ शहराचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे आहे. खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी योगदान प्रतिष्ठान नेहमीच तत्पर राहील.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!