news
Home पिंपरी चिंचवड ‘एक रुपया, एक वीट’ परंपरेतून सामाजिक समरसतेचा संदेश; वाकडात महाराजा अग्रसेन जयंती सोहळा संपन्न!

‘एक रुपया, एक वीट’ परंपरेतून सामाजिक समरसतेचा संदेश; वाकडात महाराजा अग्रसेन जयंती सोहळा संपन्न!

अग्रवाल समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; नितीन अग्रवाल व मान्यवरांकडून पूर्वजांच्या संस्कारांना उजाळा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महाराजा अग्रसेनजींची तत्त्वे युवा पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आमचा मुख्य उद्देश: उद्योजक कृष्णकुमार गोयल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १३ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

वाकड: “महाराजा अग्रसेनजी यांचे आदर्श, समाजहिताची विचारधारा आणि सामाजिक समरसतेचा संदेश येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. आजच्या युवा पिढीला महाराजा अग्रसेनजी यांच्या तत्त्वांची ओळख करून देणे तसेच समाजात एकता, सहकार्य आणि बंधुभावाची भावना दृढ करणे हाच आमचा प्रमुख उद्देश आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.
महाराजा अग्रसेन जयंतीच्या पावन निमित्ताने ‘अग्रवाल समाज, पार्क स्ट्रीट (वाकड)’ यांच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी विविध भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णकुमार गोयल बोलत होते.

वाकड येथील या उत्सवात भव्य रथयात्रा, ‘माता की चौकी’ व जागरण तसेच दांडिया उत्सव हे विशेष आकर्षण ठरले. या सोहळ्यास उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्यासह प्रमुख आयोजक नितीन अग्रवाल, डॉ. अशोक अग्रवाल (ओम हॉस्पिटल), राजकुमार अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, पवन अग्रवाल, मनीष अग्रवाल, पंकज अग्रवाल, दिनेश अग्रवाल, दीपक अग्रवाल आणि शांतनु अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णकुमार गोयल पुढे म्हणाले, “महाराजा अग्रसेनजी यांची विचारधारा एका समाजापुरती मर्यादित नसून ती समानता, सहकार्य आणि परस्पर सन्मानाची भावना वाढवणारी आहे. त्यांचे आदर्श आत्मसात करून समाज अधिक संघटित आणि सक्षम बनवता येऊ शकतो.”

प्रमुख आयोजक नितीन अग्रवाल यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “महाराजा अग्रसेनजी यांचे जीवन समाजाला सेवा, सहकार्य आणि एकतेचा संदेश देते. आम्ही प्रभू श्रीरामांचे वंशज आहोत. आपल्या पूर्वजांनी दिलेले संस्कार आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.”
तसेच, डॉ. ओम अशोक अग्रवाल यांनी महाराजा अग्रसेनजींच्या क्रांतिकारी विचारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “महाराजा अग्रसेनजी यांनी समाजात ‘एक रुपया, एक वीट’ या ऐतिहासिक परंपरेच्या माध्यमातून सामाजिक सहकार्य आणि समतेचा संदेश दिला. नव्याने येणाऱ्या बांधवाला समाजात सक्षमपणे उभे राहण्यासाठी प्रत्येकाने एक रुपया आणि एक वीट देऊन मदत करण्याची ही संकल्पना आजही सामाजिक एकतेचे आणि सहकार्याचे महान प्रेरणास्थान आहे.”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!