news
Home अमरावती ‘वैज्ञानिक दृष्टिकोन अन् संविधानिक मूल्यांची रुजवण’; वाघोलीत अंनिस शाखेचे अधिकृत उद्घाटन!

‘वैज्ञानिक दृष्टिकोन अन् संविधानिक मूल्यांची रुजवण’; वाघोलीत अंनिस शाखेचे अधिकृत उद्घाटन!

अमरावती जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक; गावपातळीवर प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याचा संकल्प | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वाघोलीत अनिस शाखेची स्थापना; सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा पुस्तकभेट देऊन सन्मान!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन , दि. १२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

वाघोली: नवरात्रीच्या पहिल्या पावन दिवसाचे औचित्य साधून मोर्शी तालुक्यातील वाघोली येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) नवीन शाखेची अधिकृत स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित आढावा बैठकीत सन २०२६ साठी नवीन शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली.
या वेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा नवरात्रीतील नवदुर्गांच्या संकल्पनेतून पुस्तकभेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला, ज्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळी सामाजिक उंची प्राप्त झाली.

हा कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्हा प्रधानसचिव विजय डवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हाकार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांच्या निरीक्षणाखाली, तसेच जिल्हाकार्यवाह व वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभागाचे नरेंद्र धर्माळे आणि समितीचे सदस्य संजय खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
गावात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या विजया माहोरे, शिला तायवाडे आणि माला तायवाडे यांचा पुस्तकभेट देऊन गौरव करण्यात आला. समाजप्रबोधनाच्या चळवळीत महिलांचा सहभाग अधिक बळकट करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अध्यक्ष आकाश विनोदराव तायवाडे (सरपंच),  उपाध्यक्ष रावसाहेब उत्तमराव तायवाडे, शिला पुरुषोत्तम तायवाडे,  कार्याध्यक्ष गजानन जन्रावजी तायवाडे,  प्रधान सचिव मायाताई दादाराव तायवाडे, शिला अरुणराव तायवाडे,  विविध उपक्रम विभाग गजानन पांडुरंग ठाकरे,  वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग  नरेंद्र अण्णाजी तायवाडे,  महिला विभाग  विजया राजेंद्र माहोरे,  जोडीदाराची विवेकी निवड विभाग ललिता गजानन ठाकरे,  व्यसन प्रबोधन आणि संघर्ष विभाग माला विलासराव तायवाडे,  संविधान जागर विभाग विजया अशोक तायवाडे 
कार्यक्रम पार पाडण्यासाठी अमरावती जिल्ह्याचे विविध उपक्रम प्रमुख आशिष देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. बैठकीचे सूत्रसंचालन नरेंद्र तायवाडे यांनी केले, तर वाघोलीचे सरपंच तथा नवनिर्वाचित अध्यक्ष आकाश तायवाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण आणि संविधानिक मूल्यांची रुजवण यासाठी गावपातळीवर सातत्याने प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. समाजात प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि चिकित्सक विचार रुजवण्यासाठी ही शाखा महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!