news
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो कामगार, महिला व युवकांचा भव्य सहभाग‘यशस्वी’ संस्थेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ‘यशोगाथा’ विशेषांकाचे भव्य प्रकाशनपिंपरी-चिंचवड महापालिका ‘ह’ प्रभाग अध्यक्षा नगरसेविका तृप्तीताई कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण व १०० राष्ट्रध्वजांचे वितरणरहाटणीत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला; महापालिका ‘ड’ प्रभाग सभापती सविताताई खुळे यांच्या हस्ते ध्वजवंदनपिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
Home पिंपरी चिंचवड मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रचार सभेच्या ठिकाणचे ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचे तीव्र निदर्शने आंदोलन

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रचार सभेच्या ठिकाणचे ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचे तीव्र निदर्शने आंदोलन

मल्लिकार्जुन खर्गे सभेच्या 'शुद्धीकरण' प्रकरणाविरोधात पिंपरीत तीव्र निदर्शने; नरेंद्र बनसोडे व मानव कांबळे यांचा घणाघात | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मनुवादी विचार संपवूनच देशाचे खरे शुद्धीकरण — नरेंद्र बनसोडे!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उत्तराखंड येथील प्रचार सभेच्या ठिकाणी होम-हवन करून तथाकथित ‘शुद्धीकरण’ करण्याच्या जातीयवादी प्रकाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस आणि विविध पुरोगामी सामाजिक संघटनांच्या वतीने आज पिंपरी चौकात तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात आले.
उत्तराखंडमधील हळदी (हल्दुआनी/हलदीप) येथे काँग्रेस पक्षाची ‘विजय शंखनाद रॅली’ रामलीला मैदानात पार पडली होती. या सभेनंतर १० ऑगस्ट रोजी ‘श्रीराम सेना धर्मार्थ सेवा संघटनेच्या’ वतीने त्या मैदानात होम-हवन आणि गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावर खर्गे यांनी संसदेत आवाज उठवला होता.

आंदोलनादरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले,
“कोणाच्या वावराने कोणता परिसर दूषित होत नाही, मात्र जातीयवाद, विषमता आणि भेदभावामुळे काही प्रवृत्तींच्या मेंदूची आणि मानसिकतेची अशुद्धी झाली आहे. ज्या पद्धतीने आज देशात राजवट सुरू आहे, त्या सत्तेचे शुद्धीकरण करणे काळाची गरज आहे. आगामी निवडणुकांच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांचा वापर करून देशातील जनता अशा मनुवादी व जातीयवादी विचारांना हद्दपार करेल.”

ज्येष्ठ समाजसेवक व पुरोगामी विचारवंत मानव कांबळे यांनीही या प्रकारावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “संसदेतील सर्वात ज्येष्ठ व दिग्गज नेते असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची अशा प्रकारे प्रताडणा करणे अत्यंत निंदनीय आहे. दलितांवर आणि शोषितांवर अन्याय-अत्याचार करण्याचा भाजप-आरएसएसच्या विचारांचा हा वैचारिक वारसा असून, या खोट्या विचारसरणीचा नाश केल्याशिवाय देशाची खरी प्रगती होणार नाही.”

या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मानव कांबळे, प्रदेश काँग्रेस नेते गौतम आरकडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते बी. बी. शिंदे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रतापराव गुरव, राहुल शिंपले, शहाबुद्दीन शेख, रवी नांगरे, अशोक मंगल, पांडुरंग जगताप, हरीश शिंदे, प्रदीप पवार, तारीख रिजवी, विल्यम साळवी, हरेश डोळस, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, सिद्धार्थ वानखेडे, देवदत्त रानवडे, संदीप शिंदे, युवराज पवार, डेनिस देवनसन, नबीलाल मुल्ला, सूरज माने, राजू परदेशी, महबूब शेख, शाहू गायकवाड, बाबा गायसमुद्रे, अशोक गायकवाड, गौरी नरसिंगे, रितिका शर्मा, नितीन सोनवणे, कृष्णा जाधव, रवींद्र दुधेकर, जितेंद्र छाबडा, विजय ओव्हाळ, अनिल सूर्यवंशी, रिजवान शेख, कुणाल भोसले, अलोक लाड, मंगेश चव्हाण, उमेश बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!