शिरूरमध्ये ‘स्वाभिमानी विकास पॅनल’चे पारडे जड; आदिवासी पारधी समाजाचा जाहीर पाठिंबा, कपबशी आणि छत्रीला विजयी करण्याचा निर्धार
शिरूर/मांडवगण फराटा, ५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
शिरूर/मांडवगण फराटा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील निवडणुकांचे रणकंदन आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक आणि स्व. अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक दादा पाटील फराटे यांच्या नेतृत्वाखालील **’स्वाभिमानी विकास पॅनल’**ला आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल आणि रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. मांडवगण फराटा येथे आयोजित बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
स्व. अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली
मांडवगण फराटा येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची शोकसभा पार पडल्यानंतर नागरिकांनी यावेळच्या निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीला मतदान करून दादांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्धार केला. गेल्या कार्यकाळात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये मोठी नाराजी असून, ही नाराजी आता दादा पाटील फराटे यांच्या बाजूने परिवर्तनाच्या लाटेत बदलताना दिसत आहे.
१) श्री. दादा पाटील फराटे (मांडवगण फराटा – वडगाव रासाई जिल्हा परिषद गट) – चिन्ह: कपबशी
२) श्री. विजेंद्र गद्रे (वडगाव रासाई पंचायत समिती गण) – चिन्ह: छत्री
३) सौ. दिपाली महेंद्र नागवडे (मांडवगण फराटा पंचायत समिती गण)
या प्रसंगी शिरूर-हवेलीचे आमदार माऊली आबा कटके, सुधीर फराटे, मांडवगण फराटा गावच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ. समीक्षा फराटे पाटील, अक्षय पाटील फराटे, बाळासाहेबभाऊ फराटे, हनुमंत अण्णा फराटे पाटील, बाबासाहेब फराटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष व आदिवासी पारधी समाज सुरक्षा दलाचे संस्थापक माऊली उर्फ किसन रामा
भोसले यांनी या पॅनलला पाठिंबा जाहीर केला. यावेळी सागर चव्हाण, सुहास भोसले, मॅनेजर भोसले, सुजल काळे, सीमा पवार, शोभा काळे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. “गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादा पाटील फराटे यांच्या पॅनलला प्रचंड मताधिक्याने निवडून आणू,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून दादा पाटील फराटे यांची ओळख असल्याने या निवडणुकीत स्वाभिमानी विकास पॅनलची घोडदौड सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

