news
जागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडले
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा जोर; ६६ पडलेली झाडे महापालिकेने तात्काळ हटवली!

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा जोर; ६६ पडलेली झाडे महापालिकेने तात्काळ हटवली!

उद्यान विभाग आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे ६६ ठिकाणी झाडे पडली होती, परंतु महानगरपालिकेने तातडीने कार्यवाही करत ही सर्व झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.

२० आणि २१ मे २०२५ या काळात पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये झाडे आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. याची माहिती मिळताच, महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

उद्यान विभाग आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे तातडीने झाडे आणि फांद्या हटवण्याचे काम सुरू केले. बुधवार (२१ मे) रात्रीपर्यंत शहरात एकूण ६६ ठिकाणी झाडे कोसळल्याची नोंद झाली होती आणि या सर्व ठिकाणांहून झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे, अशी माहिती दोन्ही विभागांनी दिली आहे.

या तत्पर कार्यवाहीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिली आणि नागरिकांना मोठा त्रास टळला. महानगरपालिकेच्या या जलद कृतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!