news
जागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडले
Home पिंपरी चिंचवड मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!

मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!

आमदार शंकर जगताप व शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी गठीत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला वेग | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड भाजपच्या विविध आघाड्यांच्या शिलेदारांना पदे बहाल! मोरवाडीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य ‘कार्यकारिणी नियुक्ती सोहळा’ संपन्न

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , २० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील लोककल्याणकारी योजनांचा शहरात अधिक विस्तार करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चेबांधणी गतिमान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजप पूर्णपणे सज्ज झाली आहे. आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या विविध महत्त्वाच्या आघाड्या व प्रकोष्ठांचा भव्य ‘कार्यकारिणी नियुक्ती प्रदान समारंभ’ मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यात नवनियुक्त शिलेदारांना अधिकृत नियुक्ती पत्रे देऊन त्यांच्यावर पक्षसंघटनेची अत्यंत महत्त्वाची आणि नवी जबाबदारी सोपविण्यात आली.

याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले:

“भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांच्या अथक कष्टावर आणि शिस्तीवर चालणारा जगातील सर्वात मोठा सर्वसमावेशक राजकीय पक्ष आहे. आज ज्या विविध प्रकोष्ठांच्या नियुक्त्या झाल्या आहेत, त्यात आपापल्या क्षेत्रातील अत्यंत तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तींचा समावेश आहे. वैद्यकीय, तांत्रिक (अभियांत्रिकी), सामाजिक आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या या नव्या शिलेदारांच्या माध्यमातून भाजपची विचारधारा आणि केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना पिंपरी-चिंचवडमधील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील, असा मला ठाम विश्वास आहे. आगामी काळात सर्वांनी एकदिलाने आणि जोमाने कामाला लागून संघटना तळागाळात अधिक मजबूत करावी.”

आमदार श्री. शंकरशेठ जगताप आणि शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते खालील नवनियुक्त प्रमुख शिलेदारांना त्यांच्या नियुक्तीची अधिकृत पत्रे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. श्री. चेतन भुजबळ (अध्यक्ष, ओबीसी मोर्चा, पिंपरी-चिंचवड), डॉ. श्री. अमित नेमाने (अध्यक्ष, वैद्यकीय प्रकोष्ठ, पिंपरी-चिंचवड), श्री. संतोष भालेराव (अध्यक्ष, अभियंता/अभियांत्रिकी प्रकोष्ठ, पिंपरी-चिंचवड), श्री. हरीश आप्पा मोरे (संयोजक, वक्तृत्व प्रशिक्षण प्रकोष्ठ, पिंपरी-चिंचवड), श्री. अंकुश शिर्के (अध्यक्ष, दिव्यांग सेल, पिंपरी-चिंचवड) नवनियुक्त अध्यक्षांनी आपापल्या आघाड्यांच्या माध्यमातून शहराच्या प्रत्येक वॉर्डात आणि प्रभागात अत्यंत सक्षम नेटवर्क उभे करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

या अत्यंत महत्त्वाच्या आणि उत्साही पक्षीय सोहळ्याला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये खालील प्रमुख नावांचा समावेश आहे:

भाजपचे संघटन सरचिटणीस श्री. मोरेश्वरभाऊ शेडगे, सरचिटणीस श्री. मधुकरभाऊ बच्चे, सरचिटणीस सौ. वैशालीताई खाडये, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. संजयभाऊ पटनी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री. दिनेशभाऊ यादव, श्री. अनुपदादा मोरे, आणि श्री. राजूभाऊ दुर्गे यांच्यासह भाजपचे विविध प्रभागांचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शेकडो उत्साही कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदन घोषणांनी आणि जल्लोषात करण्यात आली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!