news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पिंपरी चिंचवड खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘भारत जोडो संवाद’चा एल्गार; विद्यार्थ्यांमध्ये जागवली संविधानाची मूल्ये!

खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘भारत जोडो संवाद’चा एल्गार; विद्यार्थ्यांमध्ये जागवली संविधानाची मूल्ये!

नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसांची व्यापक लोकजागृती मोहीम; प्रथमेश पाटील आणि बालाजी जाधव यांचे थेरगाव व पिंपळे गुरवमध्ये प्रबोधनात्मक विचार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“उद्याचा समृद्ध भारत घडवण्यासाठी रोजच्या जगण्यात संवैधानिक मूल्यांची गरज!” राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडून ‘भारत जोडो संवाद’ उपक्रमाचा शानदार प्रारंभ

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , १९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: संसदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे लोकप्रिय राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने “भारत जोडो संवाद” या अत्यंत नाविन्यपूर्ण व वैचारिक लोकजागृती उपक्रमाचा यशस्वी प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत पहिल्याच दिवशी माध्यमिक शाळेतील तरुण विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना संविधानाचे महत्त्व, लोकशाहीची मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता याविषयी सखोल व रंजक माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे शहरातील तरुण पिढीमध्ये संवैधानिक कर्तव्यांविषयी आणि लोकशाही मूल्यांविषयी नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

थेरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘इंडी जर्नल’चे संपादक प्रथमेश पाटील यांनी अत्यंत मार्मिक विचार मांडले. ते म्हणाले:

“आपल्या देशाला जर अधिक समृद्ध आणि सुदृढ बनवायचे असेल, तर संविधानाने दिलेली जीवनमूल्ये आपल्याला केवळ पुस्तकात न ठेवता दैनंदिन व्यवहारात आणावी लागतील. समाजात दुर्दैवाने काही प्रवृत्ती स्वतःच्या क्षुद्र आनंदासाठी किंवा नैराश्यापोटी इतरांना त्रास देतात. स्वतःचे कसलेही कर्तृत्व नसल्याने अशा व्यक्ती जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून देशाची एकात्मता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या वाईट सवयींना ‘परंपरा’ असे गोंडस नाव देतात. मात्र, कोणताही धर्म कधीही कोणाचे शोषण करायला शिकवत नाही. परंपरेच्या नावाखाली सामान्य माणसाचे शोषण करणाऱ्या अशाच प्रवृत्तींना समाजात बदल किंवा सुधारणा नको असतात. म्हणूनच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या काळात प्रचंड विरोध सहन करावा लागला. उद्याचे सुजाण नागरिक म्हणून तुम्ही सर्वांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवनमूल्ये रोजच्या जगण्यात अंगीकारली पाहिजेत.”

पिंपळे गुरव येथे आयोजित संवाद सत्रात प्रसिद्ध व्याख्याते व संवाद कला प्रशिक्षक बालाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना ध्येयाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले:

“प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ‘कमी ध्येय ठेवणे हा एक गुन्हा आहे’ (Low Aim is Crime), हा महापुरुषांच्या विचारांचा संदेश आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. संविधानाचे महत्त्व, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाहीच्या हक्क व कर्तव्यांचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्याने बालपणापासूनच केला पाहिजे. संविधानाचे वाचन करून ते जीवनात अमलात आणणे हीच आपली खरी ताकद आहे. आपल्या देशाचा महान इतिहास आणि थोर महापुरुषांचे उदात्त विचार जाणून घेऊन ते आपल्या आचरणात आणले, तरच आपले वैयक्तिक आणि राष्ट्रीय जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. विद्यार्थ्यांनी देशासाठी सर्वोत्कृष्ट योगदान देण्याची जिद्द बाळगावी.”

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने राबवला जाणारा हा ‘भारत जोडो संवाद’ उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, १९ जून ते ५ जुलै २०२६ या १५ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण शहरात व्यापक पातळीवर राबवला जाणार आहे. या काळात समाजातील कष्टकरी, महिला, तरुण, व्यावसायिक आणि विविध घटकांशी थेट संवाद साधून लोकशाहीची मूल्ये अधिक घट्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी माहिती काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी दिली.

या अत्यंत यशस्वी वैचारिक अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शाळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मुख्य वक्ते प्रथमेश पाटील (इंडी जर्नल), व्याख्याते बालाजी जाधव, शालेय मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, मुख्याध्यापक पांडुरंग मुदगुन, काँग्रेस सेवा दलाचे माजी शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, शहर काँग्रेसचे माजी सरचिटणीस हिराचंद जाधव, अनुसूचित जाती (SC) विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ, माजी सरचिटणीस जितेंद्र छाबडा, तसेच काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी सदाशिव तळेकर, कुणाल भोसले, विल्यम साळवी, बाबा गायसमुद्रे, नितीन सोनवणे, रितिका शर्मा, आणि प्रवीण कांबळे यांच्यासह अनेक शिक्षक, कार्यकर्ते आणि शेकडो उत्साही विद्यार्थी उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!