news
१४ ऑगस्ट रोजी पिंपरीत निघाला भव्य मूक मोर्चा; फाळणीतील हुतात्म्यांच्या आणि विस्थापितांच्या स्मृतीस देण्यात आला उजाळाअक्षरसेवा प्रतिष्ठान व सृजन मराठी साहित्य परिषदेचा संयुक्त उपक्रम; अमरावतीतील विशेष बैठकीत निवडीची अधिकृत घोषणा व सत्कारराज्यस्तरीय ‘वनश्री वृक्षमित्र’ व ‘समाजभूषण’ पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांच्या प्रेरणेने मराठवाडा जनविकास संघाचा स्तुत्य उपक्रमज्या समाजाला मंदिरप्रवेश नाकारला, त्याच समाजातील व्यक्ती जेजुरीच्या विश्वस्तपदी असणे हे सामाजिक आणि समरसतेचे नवे पर्वनगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेविका अनिताताई काटे यांचा नागरिकांशी थेट संवाद
Home पिंपरी चिंचवड राज्यस्तरीय ‘वनश्री वृक्षमित्र’ व ‘समाजभूषण’ पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांच्या प्रेरणेने मराठवाडा जनविकास संघाचा स्तुत्य उपक्रम

राज्यस्तरीय ‘वनश्री वृक्षमित्र’ व ‘समाजभूषण’ पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांच्या प्रेरणेने मराठवाडा जनविकास संघाचा स्तुत्य उपक्रम

मराठवाडा जनविकास संघातर्फे १०५० वृक्षांचे रोपण व संविधानाची प्रत भेट; अरुण पवार यांच्या उपक्रमाचे कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पर्यावरण संवर्धन व संविधान साक्षरतेचा अनोखा संदेश! अरुण पवार यांच्या उपक्रमातून १०५० वृक्षांचे रोपण, तर शाळा-महाविद्यालयांना संविधानाची प्रत भेट

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्य व पर्यावरण संवर्धनात सातत्याने अग्रेसर असणारे, महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार’ तसेच ‘समाजभूषण पुरस्कार’ प्राप्त अरुण पवार यांच्या प्रेरणेतून व मराठवाडा जनविकास संघाच्या पुढाकाराने विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तब्बल १०५० (सहा फुटाहून अधिक उंचीच्या) रोपांचे शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. केवळ पर्यावरण संवर्धनच नव्हे, तर भावी पिढीमध्ये राष्ट्रीय मूल्ये रुजवण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था, शिक्षक व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन संविधान साक्षरतेचा एक क्रांतिकारी संदेशही यावेळी देण्यात आला.
अरुण पवार यांनी केवळ झाडे लावण्यावर भर न देता, स्थानिक संस्थांच्या सहभागातून या वृक्षांचे १०० टक्के संवर्धन आणि संगोपन करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे व समाजोपयोगी कार्यामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून जनसामान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाची एक अत्यंत आदरयुक्त व प्रेरणादायी प्रतिमा निर्माण झाली आहे.

लक्ष्मी सेवाभावी संस्था (हासेगाव शि., ता. कळंब, जि. धाराशिव) येथे संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली ५०० झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने रोपण व हरित पट्ट्याची निर्मिती. भैरवनाथ हायस्कूल (धारूर, जि. धाराशिव) येथे पर्यावरण जनजागृतीसाठी २५० वृक्षांची लागवड. श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध (पुणे) येथे ५० झाडांचे रोपण आणि प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत भेट. रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ (सोनपेठ, जि. परभणी) येथे परिसरामध्ये १०० वृक्षांचे यशस्वी रोपण. अ राय ऑफ होप चॅरिटेबल ट्रस्ट (वाकड, पुणे) येथे अभियंता संजय कुमार यांच्या पुढाकाराने बोरकरवाडी, रिहे व वाकड परिसरात १०० वृक्षांचे वाटप व रोपण. वेदांत साधना वारकरी गुरुकुल (रिहे, ता. मुळशी) येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज बोरकर (शास्त्री) यांच्या पुढाकाराने ५० झाडांचे वृक्षारोपण व वृक्षदान. या मोहिमेत वड, पिंपळ, कडुलिंब, आवळा, बेल यांसारख्या देशी व औषधी वनस्पतींसह विविध फळझाडे आणि शोभिवंत वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली.

“निसर्गाचे रक्षण करण्यासाठी झाडांची लागवड करणे आणि भावी पिढीमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत भारतीय संविधानाची प्रत भेट देणे, हा दुहेरी आनंद देणारा उपक्रम आहे. ही सर्व झाडे केवळ लावून न थांबता, स्थानिक संस्था व नागरिकांच्या सहभागातून ती शंभर टक्के जगवून त्यांचे संवर्धन केले जाईल.”
— अरुण पवार (संस्थापक-अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ)

या उपक्रमाप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष महेश आगम, पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, कैलास गायकवाड, शहाजी रानवडे, ॲड. तानाजी चोंदे, कॅप्टन युवराज माने, ह.भ.प. शेखर महाराज जांभूळकर, मंदाताई शेळके, बाबाजी शेळके, रिहेचे सरपंच धनाजी बोडके, राहुल पवळे, गोपाळ शिंदे, विजय गायकवाड, कैलास जाधव, शरदजी भोते, महादेव भोईर, तात्यासाहेब देवकर, अभियंता संजय कुमार, दत्तात्रय बंडगर, केरबा लोकरे, अण्णासाहेब गरड, विजयकुमार कुलकर्णी, युवराज सूर्यवंशी, मल्हारी कसबे, व्यंकट बंडगर, संभाजी कदम, रामराजा देडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाप्रती असलेली निष्ठा जपत अरुण पवार यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे परिसरात एक नवी ऊर्जा निर्माण झाली असून, त्यांच्या या सामाजिक नेतृत्वाचे सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!