news
१४ ऑगस्ट रोजी पिंपरीत निघाला भव्य मूक मोर्चा; फाळणीतील हुतात्म्यांच्या आणि विस्थापितांच्या स्मृतीस देण्यात आला उजाळाअक्षरसेवा प्रतिष्ठान व सृजन मराठी साहित्य परिषदेचा संयुक्त उपक्रम; अमरावतीतील विशेष बैठकीत निवडीची अधिकृत घोषणा व सत्कारराज्यस्तरीय ‘वनश्री वृक्षमित्र’ व ‘समाजभूषण’ पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांच्या प्रेरणेने मराठवाडा जनविकास संघाचा स्तुत्य उपक्रमज्या समाजाला मंदिरप्रवेश नाकारला, त्याच समाजातील व्यक्ती जेजुरीच्या विश्वस्तपदी असणे हे सामाजिक आणि समरसतेचे नवे पर्वनगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका कुंदाताई भिसे आणि नगरसेविका अनिताताई काटे यांचा नागरिकांशी थेट संवाद
Home पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडी, अपुरा वीजपुरवठा व खराब रस्त्यांमुळे २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याचा दावा; शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

वाहतूक कोंडी, अपुरा वीजपुरवठा व खराब रस्त्यांमुळे २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याचा दावा; शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चाकण एमआयडीसीतील २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत; काशिनाथ नखाते यांचा आंदोलनाचा इशारा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चाकणमधील कारखान्यांचे स्थलांतर थांबवा; उद्योग आणि कामगार वाचवा : काशिनाथ नखाते!

चाकण प्रतिनिधी बालाजी नवले , दि. १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी :चाकण एमआयडीसी (MIDC) परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी, निकृष्ट दर्जाचे रस्ते, अपुरा वीजपुरवठा आणि मूलभूत पायाभूत सुविधांच्या अभावामुळे तब्बल २० कंपन्या व उद्योग इतर राज्यांत किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ घोषणा न करता तातडीने ठोस पावले उचलावीत आणि “कारखाने वाचवा, कामगार वाचवा” ही भूमिका घेऊन हे स्थलांतर रोखावे, अशी जोरदार मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे.
नखाते यांनी सांगितले की, उद्योगांना आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करण्यात शासन अपयशी ठरल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे. चाकण हे जागतिक स्तरावर नावाजलेले औद्योगिक केंद्र असून, या भागाचा पुणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मोठा वाटा आहे. येथील कारखाने बाहेर गेल्यास हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल व स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल.

 वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी रस्ते रुंदीकरण व दुरुस्ती युद्धपातळीवर करावी.  उद्योगांना सतत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा आणि कच्चा व तयार मालाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.  उद्योग टिकवण्यासोबतच कामगारांना किमान व समान वेतन आणि सुरक्षित कामाचे वातावरण मिळावे.

 

“चाकण एमआयडीसी वाचली तरच उद्योग, रोजगार आणि हजारो कामगारांचे भविष्य सुरक्षित राहील. शासनाने केवळ चर्चेपुरते न थांबता तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अन्यथा कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— काशिनाथ नखाते (अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!