34
पिंपरी-चिंचवड शहरात ‘विभाजन विभिषिका दिन’ निमित्त भाजपच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन; सिंधी बांधवांचा मोठा सहभाग!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १६ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता ‘विभाजन विभिषिका दिन’ म्हणजेच ‘अखंड भारताची फाळणी-विभाजन दिवस’ हा भारतीय इतिहासातील काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी येथे एका भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मूक मोर्चात सिंधी समाज बांधव आणि हिंदू समाज बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
पिंपरी येथील डिलक्स चौक येथून या मोर्चाची सुरुवात झाली. हा मूक मोर्चा शगुन चौक आणि साई चौक मार्गे पुढे जात बी. टी. अडवाणी धर्मशाळा येथे येऊन संपन्न झाला, जिथे या मोर्चाचा औपचारिक समारोप करण्यात आला. फाळणीच्या वेळी विस्थापित झालेल्या, अनन्वित अत्याचार सहन केलेल्या आणि प्राण गमावलेल्या देशबांधवांच्या स्मृतीस याद्वारे भावपूर्ण उजाळा देण्यात आला.
या मूक मोर्चात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्नबापू काटे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे प्रदेश सहसंयोजक अनुप मोरे, जिल्हा संयोजक मोरेश्वर शेडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पलांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, गटनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समितीच्या माजी सभापती उषाताई वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सचिन तापकीर, प्रवक्ते राजु दुर्गे, अजित कुलथे, मंडलाध्यक्ष मोहन राऊत, मंगेश धाडगे, शिवराज लांडगे, धरम वाघमारे, मनिष पंजाबी, कुणाल साठे, ऋषिकेश वाघेरे, गणेश ढाकणे, कैलास सानप, नंदू भोगले, सचिन राऊत, महेश मोटवानी, सुरेश हेमनानी, गोपाल केसवानी, हिरालाल रिझवानी, हेमंत राजस्थ, यशवंत भोसले, उषा वाघेरे, अनिता वाळुंजकर, विशाल वाळुंजकर, रवींद्र देशपांडे, बिभीषण चौधरी, संजय पटनी, आरती चोंधे, मदन गोयल, मामा मारणे, सुधीर कुदळे, ओमप्रकाश शर्मा, रवींद्र नांदूरकर, खंडूदेव कठारे, सत्यपाल गोयल, संतोष ओझा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या मूक मोर्चाचे उत्कृष्ट संयोजन ऍड. नानिक पंजाबी, मनोहर जेठवानी, श्रीचंद नागरानी, ज्योतीका मलकानी, आतम प्रकाश मताई यांनी केले. फाळणीच्या वेदना सहन केलेल्या सिंधी समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, महिला आणि कार्यकर्ते या मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन फाळणीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

