news
जागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडले
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये जाहिरात फलकांवरील फ्लेक्स उतरवण्यास सुरुवात!

पिंपरी-चिंचवडमध्ये जाहिरात फलकांवरील फ्लेक्स उतरवण्यास सुरुवात!

मान्सूनपूर्व खबरदारी; महापालिकेचा तातडीचा निर्णय!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील सर्व जाहिरात फलकांवरील फ्लेक्स उतरवण्यास आजपासून सुरुवात केली आहे. मान्सूनपूर्व जोरदार पावसाचा अनुभव लक्षात घेता, सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. विभागामार्फत शहरात उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांची सुरक्षितता आणि स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी वेळोवेळी तपासली जाते. मान्सूनपूर्व काळात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

याचाच भाग म्हणून, यापूर्वी २५ मे २०२५ ते ७ जून २०२५ या कालावधीत जाहिरातदारांना फ्लेक्स उतरवण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाचा अनुभव पाहता, आता तातडीने, म्हणजेच आज २२ मे २०२५ पासूनच हे काम सुरू करण्यात आले आहे, असे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.

उपायुक्त आगळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, “नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे जाहिरात फलकांचे फ्लेक्स फाटून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे, कोणताही धोका पत्कर नये म्हणून आम्ही आजपासूनच फ्लेक्स उतरवण्यास सुरुवात केली आहे.”

महानगरपालिकेने शहरातील सर्व जाहिरातदारांना या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!