news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पुणे पिंपरी-चिंचवड मनपाचा गलथान कारभार उघड! सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळेंच्या पाठपुराव्याला यश!

पिंपरी-चिंचवड मनपाचा गलथान कारभार उघड! सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळेंच्या पाठपुराव्याला यश!

वारंवार पाठपुराव्यानंतर मनपाला जाग; पिंपरीतील रस्ता दुरुस्त!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ढिसाळ कारभाराचे आणखी एक उदाहरण पिंपरी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी उघडकीस आणले आहे. प्रभाग ग मधील स्थापत्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर सुहास कुदळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पिंपरी गाव, अशोक टॉकीज रोडवरील गणेश वस्तू भंडार समोरील साई वैष्णवी सोसायटी मागील गल्लीतील पेव्हिंग ब्लॉकची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे या भागातील नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. येथील नागरिक आणि श्री. सुनील अभंग यांच्या तक्रारीनंतर सुहास कुदळे यांनी सातत्याने महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे या समस्येचा पाठपुरावा केला.

त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाला जाग आली आणि परिसरातील खराब झालेले पेव्हिंग ब्लॉक दुरुस्त करण्यात आले. यामुळे आता नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. सुहास कुदळे यांच्या या कार्यामुळे पिंपरी गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या घटनेवरून महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांच्या समस्यांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागणे, हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करते, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? महानगरपालिकेचा कारभार अधिक सुधारण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!