news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home मावळमहाराष्ट्र सीडीसीसी बँकेतील भरती घोटाळा: कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांची तपासणी करण्याची मागणी!

सीडीसीसी बँकेतील भरती घोटाळा: कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांची तपासणी करण्याची मागणी!

नियम धाब्यावर बसवून भरती! कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या खात्यांची चौकशीची मागणी!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (सीडीसीसी) नोकर भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने केला आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर यांनी प्रत्येकी २५ ते ४० लाख रुपये घेऊन ही भरती प्रक्रिया पार पाडली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या पदाधिकाऱ्यांनी भरती झालेल्या काही कर्मचाऱ्यांची नावे आणि त्यांचे बँकेतील अधिकारी-कर्मचारी असलेले पालक व नातेवाईक कसे पैसे देऊन भरती झाले, याची यादीच पत्रकारांसमोर ठेवली. समितीने मागणी केली आहे की, या भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या आई-वडिलांसह नातेवाईकांच्या बँक खात्यांची सखोल चौकशी करावी. यासाठी लवकरच सीडीसीसी बँकेच्या नोकर भरती चौकशी समितीच्या अध्यक्षांकडे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) मागणी करणार असल्याचा इशाराही समितीने दिला आहे.

सीडीसीसी बँकेच्या ३६० पदांच्या नोकर भरतीत सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आणि मागासवर्गीयांचे आरक्षण संपवून जानेवारी २०२५ मध्ये ही भरती घेण्यात आली, असा आरोप आहे. या चुकीच्या पद्धतीने झालेल्या भरतीविरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने तब्बल २८ दिवस आंदोलन केले. त्यानंतर माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकऱ्यांना चौकशीचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

आता विभागीय सहनिबंधक वानखेडे यांच्या आदेशाने नोकर भरतीची चौकशी समिती नेमून बँकेची सर्व कागदपत्रे तपासली जात आहेत. आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी लवकरच चौकशी समितीपुढे आपले पुरावे सादर करणार आहेत. या पत्रकार परिषदेत समितीचे समन्वयक राजू कुकडे, सूर्या अडबाले, संजय कन्नावार, मनोज पोतराजे, अनुप यादव, नभा वाघमारे, महेंद्र खंडाळे, दिनेश एकवनाकर आदी उपस्थित होते.

कोणाची मुले बँकेत लागली?

राजू कुकडे यांनी आरोप केला की, सीडीसीसी बँकेचे कर्मचारी आणि इतर कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी यांच्या मुला-मुलींना पैसे देऊन आणि शिफारशीने बँकेत भरती करण्यात आले आहे. त्यांनी काही कर्मचाऱ्यांची नावे वाचून दाखवली, ज्यांच्या वडिलांचे बँकेत किंवा इतर शासकीय कार्यालयात कर्मचारी आहेत. यात सारंग जयकृष्ण तिजारे, प्रतीक रामभान बोधले, कु. मोहिनी मुकुंदा कुबे, स्वप्नील दिलीप येरोजवार, कु. पुजा विजय बावणे, मो. राउफ मो. शरीफ शेख, कुणाल सुनील रघाताटे, लोकेश राजेश डॉगरवार, गोपाल विलास सातपुते, स्वप्नील रमेश अडवाले, यशवंत राजेशसिंग चौहान, सौ. काजल वैभव दिवे, अमोल शेरकी, कु. स्नेहल रवींद्र टाजणे, राहुल श्याम गरडे, कु. शिल्पा नत्धुजी बेलेकर, कु. रूपाली सुधाकर पोडे, मनीष प्रभू सूर्यवंशी, प्रणय दत्तात्रय वाढई, कु. दीक्षा मरोहर चन्ने, अंकित विठ्ठल जोगी, तुषार सत्यपाल मस्की, ओमकार संजय शास्त्रकार, कु. आकांक्षा नरेंद्र वाजणे, स्वप्नील केशवराव बाजगामे, तन्मय विजय बोरीकर, विशाल विजय खंगार, धनंजय ताराचंद निखाडे, आनंद अशोक पवार, मयूर रवींद्र संभाणी, ताराचंद धनंजय निखाडे, स्वप्नील केशव दाजगावे इत्यादींचा समावेश आहे. यांच्या पालकांच्या आणि नातेवाईकांच्या बँक खात्यांची चौकशी केल्यास सत्य समोर येऊ शकते, असा दावा समितीने केला आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!