news
Home समाजकारण प्रशांत महाजन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पिंपरी चिंचवड शहर ओबीसी सेल अध्यक्षपदी विराजमान!

प्रशांत महाजन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पिंपरी चिंचवड शहर ओबीसी सेल अध्यक्षपदी विराजमान!

सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) च्या ओबीसी सेलला नुकताच नवा अध्यक्ष मिळाला आहे. तरुण, तडफदार आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले प्रशांत भास्कर महाजन यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.

प्रशांत महाजन हे खान्देश माळी मंडळाचे सदस्य आणि खान्देश विकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क पाहता, ओबीसी समाजाच्या प्रश्नांना ते योग्य पद्धतीने वाचा फोडतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे, विधानसभेचे उपसभापती आण्णा बनसोडे, आमदार विलास लांडे, महापौर योगेश बहल, कविताताई आल्हाट, सचिन आवटे, प्रकाश सोमवंशी, नाना काटे, प्रशांत शितोळे आणि कांबळे साहेब यांसारखे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नियुक्तीनंतर प्रशांत महाजन यांनी पक्षासाठी झोकून देऊन काम करण्याची आणि राज्यातील तसेच देशातील सर्वात मोठ्या असलेल्या ओबीसी समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या निवडीनंतर सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे ओबीसी सेलला नवी दिशा मिळेल, यात शंका नाही.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!