news
दौंड-अहिल्यानगर हायवेवर बळीराजाचा संताप; मारुती भापकरांच्या नेतृत्वाखाली कोळगाव फाट्यावर भव्य ‘रास्ता रोको’!पीसीएमसी आयुक्तांचा कामचुकार अधिकाऱ्यांना सज्जड दम; नागरिकांच्या तक्रारी रेंगाळल्यास थेट निलंबनाची टांगती तलवार!सांगवी केसरी कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेसाठी काँग्रेस आक्रमक; थेट पुणे विद्यापीठात दिली धडक!पिंपरी मनपात ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या स्टारकास्टचा राबता; महापौर रवि लांडगे यांच्याकडून जंगी स्वागत!मुंबई-पुणे हायवेवरील कामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून ऑन-द-स्पॉट पाहणी; निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांना मोठा दणका; चाकणमधून ५७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांना मोठा दणका; चाकणमधून ५७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

अँटी नार्कोटिक्स सेलची रुबी बेकरी जवळ धडक कारवाई; महिंद्रा स्कोर्पिओसह दोन आरोपी गजाआड, ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चाकणमध्ये ५७ लाखांच्या ८४ किलो गांजासह दोघांना अटक; पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , १९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालणे आणि त्याचे समूळ उच्चाटन करणे या संदर्भात पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुन्हा एकदा मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या विशेष कारवाईत पोलिसांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, ३ मोबाईल, रोख रक्कम आणि एक स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन अंमली पदार्थ तस्करांना जेरबंद केले आहे.

 

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस पथक आयुक्तालय हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, पोलीस अंमलदार निखिल वर्षे आणि विजय दौंडकर यांना मिळालेल्या गोपनीय व संशयास्पद माहितीच्या आधारे १८ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे चाकण येथील रुबी बेकरी जवळ, खंडोबा माळ (ता. खेड, जि. पुणे) येथे सार्वजनिक ठिकाणी सापळा रचण्यात आला.

तेथे संशयास्पद रित्या आढळलेल्या २ आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे अवाढव्य प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.

अटक करण्यात आलेले आरोपी: १) अनिकेत राजेंद्र बिरंगळे (वय २४ वर्षे, रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे) २) कुशल उद्धव पाठक (वय २४ वर्षे, रा. गल्ली क्रमांक २०, शिवसाई नगर, सुतारदरा, कोथरूड, पुणे)

अटक करण्यात आलेल्या दोन्ही तस्करांकडून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.  ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा: (बाजार मूल्य अंदाजे ₹४१,९८,०००/-), ०३ अँड्रॉइड मोबाईल फोन: (किंमत ₹७५,०००/-), रोख रक्कम: ₹५१०/- (पाचशे दहा रुपये), महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी: (किंमत ₹१५,००,०००/-)

आरोपींविरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) ॲक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) दगडे करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात किंवा परिसरात अंमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ खालील अधिकृत संपर्क माध्यमांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे:

  • अंमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड: ८६००००२३२० (8600002320)
  • पोलीस हेल्पलाईन: ११२ (112)
  • NCB मानस हेल्पलाईन: १९३३ (1933) किंवा ईमेल: infoncbmanas@gov.in

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मा. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) मा. श्री. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) मा. श्री. रोहिदास पवार, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) मा. श्री. प्रवीण मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाई करणारे पोलीस पथक: अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मोमीन, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज (पोहवा/१२२२), ज्ञानेश्वर मुळे (पोहवा/२३६७), किशोर परदेशी (पोहवा/१५०७), निखिल शेटे (पोहवा/१७०६), विजय दौंडकर (पोहवा/१९१६), सदानंद रुद्राक्षे (पोशि/२०९८), निखिल वर्षे (पोशि/२३८१) आणि कपिलेश इंगवे (पोशि/२७१२) यांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

तसेच गुन्हे अन्वेषणमधील तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस अंमलदार सुभाष गुरव (पोशि/२४३०) आणि प्रकाश नानावर (पोहवा/३०६८) यांनी विशेष मदत केली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!