news
‘श्रम साफल्य योजनेतून १९ कर्मचाऱ्यांना हक्काचे घर अन् १७ जणांना नियुक्तीपत्रे’; पिंपरीत महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व उत्साहात!‘दुष्काळी भागात चारा छावण्या, मोफत पाणी अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तातडीने सुरू करा’; पिंपरीत सर्वपक्षीय संघटनांचे आंदोलन!‘चायनीज सायबर चोरांशी पार्टनरशिप करून चालवत होता काळा धंदा’; पिंपरी सायबर पोलिसांच्या জাळ्यात मास्टरमाइंड!‘सांस्कृतिक मूल्ये आणि गणेशोत्सवाची परंपरा जपणारा कौतुकास्पद उपक्रम’; राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने १२ व्या फोटो कॉन्टेस्टचे यशस्वी आयोजन!‘एआय, सायबर सुरक्षा आणि डेटा सेंटर सेवांमध्ये फिडेलची जागतिक भरारी’; सॉफ्टेंजरच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू!
Home पिंपरी चिंचवड ‘चायनीज सायबर चोरांशी पार्टनरशिप करून चालवत होता काळा धंदा’; पिंपरी सायबर पोलिसांच्या জাळ्यात मास्टरमाइंड!

‘चायनीज सायबर चोरांशी पार्टनरशिप करून चालवत होता काळा धंदा’; पिंपरी सायबर पोलिसांच्या জাळ्यात मास्टरमाइंड!

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी; तुषार चौधरी व आदर्श वाघमारेपाठोपाठ दुबईवरून मुख्य सूत्रधार डिपोर्ट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दुबईहून सायबर फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधारास पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून बेड्या!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत, दुबईत बसून भारतातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला इंटरपोलच्या साहाय्याने दुबईतून डिपोर्ट (परत आणून) मुंबई विमानतळावरून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. आरोपी हे परदेशात राहून वेगवेगळ्या बँक खात्यांच्या माध्यमातून सायबर गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने ऑनलाइन गुन्ह्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बँक खात्यांविरोधात आयुक्तालयात आतापर्यंत एकूण ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.रं. नं. ४२/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१७(२), ६१(२), ३(५)) नुसार बँक खाती पुरवणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. सानेवस्ती, चिखली, पुणे) हा व्यक्ती बँक खाती काढून त्यावर साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्ह्यांतील रक्कम स्वीकारून ती रोख स्वरूपात काढत आहे.
त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तुषार चौधरी आणि त्याचा साथीदार आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी, पुणे) यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्यांचा मुख्य साथीदार सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) हा सध्या दुबई येथे राहून हा सर्व काळा धंदा चालवत असल्याचे समोर आले.

मुख्य आरोपी सुमंत दसरे हा सुरुवातीला दुबईत ६ हजार दिराम पगारावर शेअर ट्रेडिंग व टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग आणि मेसेजिंगचे काम करत होता. पीडितांच्या रकमेपैकी ४ टक्के कमीशन घेत असतानाच, त्याला चायनीज सायबर गुन्हेगारांची माहिती मिळाली.  चायनीज आरोपींकडून वेगवेगळे इंटरनॅशनल कार्ड्स घेऊन तो मॉलमधून महागड्या वस्तू खरेदी करत असे आणि त्या बदल्यात चायनीज आरोपींकडून कमिशन मिळवत असे. हळूहळू सायबर गुन्ह्याची पूर्ण माहिती मिळाल्याने त्याने चायनीज आरोपींसोबत पार्टनरशिपमध्ये फ्रॉडचे काम सुरू केले. त्या बदल्यात त्यास फ्रॉड रकमेच्या २० टक्के रक्कम मिळत असे.  या कामासाठी त्याने तुषार चौधरी व आदर्श वाघमारे यांच्यामार्फत १५० पेक्षा जास्त बँक खाती मिळवली होती. या खात्यांवर सायबर फसवणुकीचे पैसे मागवले जात. हे पैसे तुषार व आदर्श चेकद्वारे रोախ स्वरूपात काढून, स्वतःचे कमिशन ठेवून उरलेली रक्कम सीडीएम (CDM) द्वारे सुमंतने दिलेल्या बँक खात्यावर दुबईत पाठवत असत.

 

सुमंत दसरे याने आतापर्यंत या माध्यमातून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमावली असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. त्याच्याविरुद्ध हैदराबाद (तेलंगणा) आणि काळेवाडी पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार सपोनि प्रवीण स्वामी यांनी आरोपी सुमंत दसरे याची गोपनिय माहिती गोळा केली. वरिष्ठांच्या परवानगीने त्याच्याविरुद्ध L.O.C. (Look Out Circular Notice) ओपन करण्यात आली.
या लुक आउट सर्क्युलरच्या आधारे इंटरपोल (Interpol) च्या मार्फत मुख्य आरोपी सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे यास दुबईत ताब्यात घेण्यात आले. त्यास दुबईतून भारतात ‘डिपोर्ट’ (Deport) केल्यानंतर मुंबई विमानतळावर सपोनि प्रवीण स्वामी व त्यांच्या पथकाने त्यास बेड्या ठोकल्या आणि सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अधिकृतपणे अटक केली.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. मोरे वस्ती, चिखली रोड, पुणे), आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी, पुणे), सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) सध्या या आरोपींना दिनांक ०४/११/२०२६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, दुबईत सुरू असलेल्या कॉल सेंटरची माहिती मिळवणे आणि इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रवीण स्वामी, सपोनि वैभव पाटील, पोलीस उपनिक्षक रोहित डोळस, सागर पोमण, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील तसेच पोलीस अंमलदार दीपक भोसले, नितेश बिचेवार, देवा वाघमारे, अतुल लोखंडे, स्वप्निल खणसे, श्रीकांत कबुले, माधव आरोटे, सोपान बोधवड आणि महिला पोलीस अंमलदार दिपाली चव्हाण यांच्या पथकाने या अत्यंत गुंतागुंतीच्या व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कारवाईत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!