news
‘श्रम साफल्य योजनेतून १९ कर्मचाऱ्यांना हक्काचे घर अन् १७ जणांना नियुक्तीपत्रे’; पिंपरीत महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व उत्साहात!‘दुष्काळी भागात चारा छावण्या, मोफत पाणी अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तातडीने सुरू करा’; पिंपरीत सर्वपक्षीय संघटनांचे आंदोलन!‘चायनीज सायबर चोरांशी पार्टनरशिप करून चालवत होता काळा धंदा’; पिंपरी सायबर पोलिसांच्या জাळ्यात मास्टरमाइंड!‘सांस्कृतिक मूल्ये आणि गणेशोत्सवाची परंपरा जपणारा कौतुकास्पद उपक्रम’; राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने १२ व्या फोटो कॉन्टेस्टचे यशस्वी आयोजन!‘एआय, सायबर सुरक्षा आणि डेटा सेंटर सेवांमध्ये फिडेलची जागतिक भरारी’; सॉफ्टेंजरच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू!
Home पिंपरी चिंचवड ‘श्रम साफल्य योजनेतून १९ कर्मचाऱ्यांना हक्काचे घर अन् १७ जणांना नियुक्तीपत्रे’; पिंपरीत महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व उत्साहात!

‘श्रम साफल्य योजनेतून १९ कर्मचाऱ्यांना हक्काचे घर अन् १७ जणांना नियुक्तीपत्रे’; पिंपरीत महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व उत्साहात!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात भव्य सोहळा संपन्न; सुरेल गीते व लावणी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शहराच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार म्हणजे सफाई कर्मचारी: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: शहराच्या स्वच्छतेसाठी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सफाई कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छता क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे. शहराच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार हे सफाई कर्मचारी असून, त्यांच्या कामाचा योग्य सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची मूलभूत जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२६’ चे भव्य आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाचे अधिकृत उद्घाटन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मकवाना यांच्या शुभहस्ते पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

या सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष धनराज बीर्दा, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपआयुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड. सागर चरण, अखिल वाल्मिकी समाज पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजेश बडगुजर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या उद्घाटनाच्या भाषणात बोलताना अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना म्हणाले की, “महर्षी वाल्मीकी यांनी आपल्या विचारांतून अखंड समाजाला समता, बंधुता आणि मानवतेचा महान संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान आणि समान संधी मिळणे आवश्यक आहे. शहराच्या स्वच्छतेचा लौकिक वाढवण्यात सफाई कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि समर्पण वाखाणण्याजोगे आहे.”

मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वच्छ सर्वेक्षणात शहराने मिळविलेल्या यशाचे श्रेय कर्मचाऱ्यांना दिले.
“स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराने राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यामागे प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याची मेहनत आणि सातत्यपूर्ण योगदान मोलाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी ओडिशा शासनाच्या ‘गरिमा’ योजनेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही लवकरच स्वतंत्र कल्याणकारी योजना सुरू करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.”
— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा)

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत महापालिकेत २५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केलेल्या १९ कर्मचाऱ्यांना हक्काच्या घरांचे वाटप करण्यात आले. तसेच १७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर उपमहापौर शर्मिला बाबर, उपआयुक्त अण्णा बोदडे व राजेश बडगुजर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

प्रबोधन पर्वाच्या निमित्ताने शहरात विविध मनोरंजनपर व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाने रसिकांना संगीताची मेजवानी अनुभवण्याची संधी दिली.महिलांसाठी खास पारंपरिक लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी लोककलेचा आविष्कार आणि गीत-संगीताच्या सुरेल वातावरणाला पिंपरी-चिंचवडकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!