35

फिडेल सॉफ्टटेक लि. ने केली ‘सॉफ्टेंजर’ कंपनीच्या धोरणात्मक अधिग्रहणाची घोषणा!
पुणे/पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: जपानमध्ये टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि लँग्वेज सोल्युशन्स क्षेत्रात प्रस्थापित नाव असलेल्या फिडेल सॉफ्टटेक लि. या कंपनीने आज ‘सॉफ्टेंजर’ (Softenger) आणि तिच्या ग्रुप कंपन्यांच्या धोरणात्मक अधिग्रहणाची (Acquisition) प्रक्रिया सुरू केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे फिडेलच्या जागतिक विस्ताराला आणि आयटी सेवा क्षेत्रातील क्षमतेला मोठी गती मिळणार आहे.
सॉफ्टेंजर ही भारत, सिंगापूर, मलेशिया आणि युनायटेड अरब अमिराती (UAE) मध्ये कार्यरत असून सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल असलेली एक प्रस्थापित आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, सायबर सिक्युरिटी, डेटा सेंटर सपोर्ट आणि मॅनेज्ड सर्व्हिसेस क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे.

हे नियोजित अधिग्रहण फिडेलच्या विकासाच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे कंपनीचा ग्राहकवर्ग, वितरण क्षमता (Delivery Capabilities) आणि आशियातील भौगोलिक क्षमतांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे.
अधिग्रहणाचे प्रमुख फायदे- अनुभवी आयटी व्यावसायिकांचा मोठा समूह, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, एंटरप्राइझ सपोर्ट व मॅनेज्ड सर्व्हिसेस मधील क्षमतांमध्ये वाढ. क्रॉस सेलिंग, कार्यान्वयन समन्वय आणि व्यवस्थापित सेवांमध्ये एआय (AI) चलित ऑटोमेशनचा अवलंब करण्याच्या व्यापक संधी. जपानच्या उद्योग जगतातील अस्तित्व, बहुभाषिक क्षमता आणि डिजिटल परिवर्तन कौशल्याला सॉफ्टेंजरच्या पायाभूत सुविधांची जोड देऊन जागतिक स्तरावर एकात्मिक तंत्रज्ञान सेवा समूह म्हणून फिडेल आपले स्थान अधिक मजबूत करेल.

“सॉफ्टेंजर आणि तिच्या समूह कंपन्यांचे नियोजित अधिग्रहण हे फिडेलच्या विकासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही नैसर्गिक वाढ आणि धोरणात्मक अधिग्रहणाद्वारे क्षमता सातत्याने वाढवत आहोत. सॉफ्टेंजरमुळे आम्हाला विस्तारित कार्यक्षेत्र, अनुभवी टीम आणि अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ग्राहक संबंध प्रस्थापित करता येतील. जपानमधील कौशल्य, डिजिटल परिवर्तन क्षमता आणि एआय सेवा अधिक सक्षम करण्याची संधी याद्वारे मिळेल. पुढील काळात महसूल वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करून दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर आमचा भर असेल.”— सुनील कुलकर्णी (सीईओ व संस्थापक अध्यक्ष, फिडेल सॉफ्टटेक लि.)
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर सूचीबद्ध असलेली ही आयटी व भाषा सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सलग चौथ्या वर्षी भागधारकांसाठी २२.५ टक्के लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. जपान, भारत आणि अमेरिका येथे कार्यरत असलेली ही कंपनी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर, मॅनेज्ड सर्व्हिसेस, एंटरप्राइझ सोल्यूशन्स, एआय-डेटा ॲनालिटिक्स आणि लोकलायझेशन सेवा पुरवते. (अधिक माहितीसाठी: www.fidelsoftech.com)
भारत, सिंगापूर, मलेशिया व युएई मध्ये कामकाज असणारी ही आयटी सेवा कंपनी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सेंटर सपोर्ट आणि मॅनेज्ड सर्व्हिसेसमध्ये विशेष प्राविण्य बाळगून आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
