news
‘प्रास्ताविका हे देशाचा आत्मा; बेकायदेशीर कारवाईविरुद्ध न्यायालयात दाद मागणार’; नरेंद्र बनसोडे आक्रमक!‘गीतगायन, मराठी म्हणी अन् सण-उत्सवाचा आनंद’; सांगवीत ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!‘सत्तेच्या जोरावर पर्यावरणाचा ऱ्हास आणि कष्टकऱ्यांचा विनाश खपवून घेणार नाही’; मारुती भापकर यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले!‘अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांची आजच्या काळात सुसंगतता’; पिंपरी पालिकेत ‘सरदार प्रबोधन पर्व’ उत्साहात सुरू!‘दुष्काळमुक्तीच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे’; सांगोल्यातील आमरण उपोषणाला मराठवाडा जनविकास संघाचा पाठिंबा!
Home पिंपरी चिंचवड ‘प्रास्ताविका हे देशाचा आत्मा; बेकायदेशीर कारवाईविरुद्ध न्यायालयात दाद मागणार’; नरेंद्र बनसोडे आक्रमक!

‘प्रास्ताविका हे देशाचा आत्मा; बेकायदेशीर कारवाईविरुद्ध न्यायालयात दाद मागणार’; नरेंद्र बनसोडे आक्रमक!

सांगवीतील संविधान प्रास्ताविका शिल्प प्रकरणी 'संविधान सन्मान निर्धार सभा'; पीडब्ल्यूडी क्वार्टरच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारण्याची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आंदोलन तात्पुरते स्थगित परंतु कारवाईसाठी पाठपुरावा चालूच राहणार: काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी: सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प मनपा प्रशासनाकडून बेकायदेशीरपणे हटविल्याच्या घटनेविरोधात आयोजित करण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान निर्धार सभे’मध्ये काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी आंदोलनाच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि ज्येष्ठ नेत्यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन केवळ तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी संविधान विरोधी प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत आणि पीडब्ल्यूडीच्या जागेवर ‘संविधान सृष्टी’ उभारणीसाठी महापालिका व न्यायालयात आमचा संघर्ष व पाठपुरावा चालूच राहील, अशी आक्रमक घोषणा त्यांनी केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आणि मारुती भापकर यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची अधिकृत विनंती केली, ज्याला उपस्थितांनी सर्वानुमते संमती दर्शविली.

नरेंद्र बनसोडे यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सांगितले की, “१४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर, १५ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०२२ मध्ये उभारलेले भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त करण्यात आले. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि संविधानाचा थेट अवमान करणारी आहे. ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन कोणतीही वर्क ऑर्डर नसताना हे स्मारक हटविल्याचे नमूद केले होते.”
त्यानंतर काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन २४ तासांत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. २२ ऑक्टोबरपासून संविधान चौकात बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले. या प्रकरणी संतोष कांबळे व इतरांवर एफआयआर दाखल झाला असला, तरी जेसीबी चालक, मुख्य सूत्रधार व वाहनांवर ठोस कारवाई झालेली नाही. याशिवाय नगरसेविका तृप्ती कांबळे यांनी केलेल्या कृत्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे बनसोडे यांनी स्पष्ट केले.

 संविधान चौकात केवळ प्रास्ताविकेचे शिल्प न ठेवता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.  परिसरातील मोडकळीस आलेल्या पीडब्ल्यूडी (PWD) क्वार्टर्सच्या जागेचा प्रभावी वापर करून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र किंवा ‘अध्ययन सृष्टी’ निर्माण करावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका व सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वसतिगृह उभारले जावे.  या मागण्यांसंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून, जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग, पोलीस आयुक्तालय आणि कला संचालनालयाकडून सर्व अधिकृत परवानग्या मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल.

 

“संविधानाची प्रास्ताविका हा या देशाचा आत्मा आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे. आमची लढाई कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरुद्ध नसून संविधानविरोधी प्रवृत्तीविरुद्ध आहे. सांगवी परिसरातील नागरिकांच्या अस्मितेला व मागण्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
— नरेंद्र बनसोडे (शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस)

या निर्धार सभेला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा भगतसिंग परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोकराव मोरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, काँग्रेस एससी/एसटी विभागाचे शहराध्यक्ष रवी नांगरे, बी. बी. शिंदे, अनिता सोनवणे, अनिता साळवे, कविता कोंडे, डॉ. राजेश मंगल, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, स्वराज इंडियाचे प्रदीप पवार, काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष कुणाल भोसले, अप्पा शिंदे, हिराचंद जाधव, सदाशिव तळेकर, हरीश डोळस, रवी भोजकर, देवदत्त रानवडे, शाही ओवाळ, बाबा गायसमुद्रे, विरेंद्र गायकवाड, प्रवीण कांबळे, शाहू गायकवाड, अशोक मंगल, गौरी नरसिंगे, विलास सकट, सविता सकट, कृष्णा जाधव यांसह विविध सामाजिक संघटनांचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!